​‘वजन घटविण्याचे’ चुकीचे फॅड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2016 10:59 AM2016-06-15T10:59:41+5:302016-06-15T16:29:41+5:30

फसव्या, कुचकामी फॅड्सबद्दल तुम्हाला आम्ही सजग करत आहोत.

'Weight Loss' False Fads | ​‘वजन घटविण्याचे’ चुकीचे फॅड्स

​‘वजन घटविण्याचे’ चुकीचे फॅड्स

Next
ढते वजन कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जात नाही? डाएट, योगा, जेल ते टेलिशॉपिंगचे प्रोडक्ट्सपर्यंत सर्व गोष्टी केल्या जातात. पण पोटाचा घेर काही कमी होत नाही.

फिटनेस आणि विशेष करून ‘वेटलॉस’बाबती अधूनमधून अनेक फॅड येतात आणि जातात. त्यामुळे कोणाचे खरंच कोणाचे भले होते का, हा तपासण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे अशा फसव्या, कुचकामी फॅड्सबद्दल तुम्हाला आम्ही सजग करत आहोत.

डिटॉक्स पाणी

‘डिटॉक्स वॉटर’ची सध्या खूप क्रेझ आहे. उन्हातूून थकून भागून घरी आल्यावर लिबंू पाणी किंवा पाण्यात कोथिंबीर टाकून पिल्याने शरीरातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी मदत होते मात्र त्याने वजन कमी होत असा गैरसमज सर्वप्रथम काढून टाका.

बर्पीज्

व्यायामाने वजन कमी होते हे खरे आहे. परंतु सध्या फॅड असलेला व्यायामाचा प्रकार ‘बर्पीज्’ यामध्ये किती प्रभावी आहे याबाबत जरा शंकाच आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जर तुम्हाला कोणी ‘बर्पीज्’ व्यायाम करण्यास सांगत असेल तर सावधान! त्याऐवजी उठाबशा, दोरीवरील उड्या किंवा धावायला पाहिजे.

गॅस मास्क ट्रेनिंग

श्वसनाचा हा प्रकार का लोकांना एवढा आवडतोय, हे एक रहस्य आहे. मुळात गुदमरून तुमच्या श्वसन प्रक्रियेला अडथळा आणून वजन कसे कमी होऊ शकते? साध्या-सोप्या व्यायामाला श्वास रोखून अधिक किचकट आणि अवघड केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ‘ग्लुकोकोर्टिकॉईड्स’सारखे स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढेल.

ग्लुटेनमुक्त डाएट

थायरॉईडच्या रुग्णांना ‘ग्लुटेनमुक्त’ आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु वेटलॉससाठी असा आहार घेण्याचे केवळ फॅड आहे. ग्लुटेन हे प्रोटीन असून गहू-ज्वारीसारख्या धान्यात आढळते. तसेच सिरियल्स, पास्ता, ब्रेड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नातही ते असते. त्यामुळे सामान्य व्यक्तीने ग्लुटेनरहित आहार घेणे म्हणजे चांगल्या प्रोटिनपासून वंचित राहिल्यासारखे आहे.

Web Title: 'Weight Loss' False Fads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.