उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी या गोष्टींचा डाएटमध्ये करा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 03:39 PM2018-04-13T15:39:31+5:302018-04-13T15:39:31+5:30

तसा गरमीचा मौसम वजन कमी करण्यासाठी चांगला मानला जातो. तापमान जास्त असल्याने या दिवसात खाणंही कमी होतं.

Weight loss tips in summers | उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी या गोष्टींचा डाएटमध्ये करा समावेश

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी या गोष्टींचा डाएटमध्ये करा समावेश

Next

जर तुम्हीही वर्षाच्या सुरुवातीला वजन कमी करण्याचा संकल्प केला होता आणि आत्ता त्याबाबत काही खास करु शकले नसाल. तर आताही वेळ गेलेली नाही. या गरमीच्या मौसमातही तुम्ही तुमचं वजन कमी करु शकता. त्यासाठी काही खास गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. 

तसा गरमीचा मौसम वजन कमी करण्यासाठी चांगला मानला जातो. तापमान जास्त असल्याने या दिवसात खाणंही कमी होतं. या दिवसात आपल्या डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास  तुम्हाला वजन कमी करण्यास चांगली मदत होईल. 

1) सॅलड खाणे तुमच्यासाठी फायद्याचं राहील. गरमीच्या दिवसात काकडी, गाजर, टोमॅटो यांचं सॅलड पोषण देण्यासोबतच पाण्याची कमतरताही भरुन काढतं. सॅलड खाल्ल्याने तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही फास्ट फूडपासून लांब राहाल.

2) दही आणि ताक या दिवसात भरपूर घ्या. याचे अनेक फायदे आहेत. याने शरीरातील वाढलेलं तापमान कमी होण्यास मदत होईल आणि तुमचं वजनही कमी होईल. तसेच यामुळे तुमचं पोटही भरलेलं राहील.   

3) हलक्या भाज्यांचं सेवन करा. या दिवसात लौकी, गिलकं यांसारख्या भाज्या फायदेशीर असतात. या तुमचं वजन कंट्रोल करतात आणि सोबतच पचनक्रियाही चांगली राहाते. 

4) उन्हाळ्यात खरबूज आणि कलिंगड खाणे सुद्धा अधिक फायद्याचं ठरतं. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आंब्यांपासून लांबंच राहीलेलं बरं. 

5) उन्हाळ्यात लिंबू पाण्याचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. याने शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत मिळते.

Web Title: Weight loss tips in summers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.