ना जास्त खर्च, ना केमिकल्सचा वापर नॅचरल पद्धतीने काही दिवसात काळे होतील पांढरे केस!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:03 AM2024-11-27T11:03:46+5:302024-11-27T11:04:51+5:30

White hair home Remedies : काही घरगुती उपाय ही समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. या उपायांच्या मदतीने नॅचरल पद्धतीने केस पुन्हा काळे करता येतात.

White hair home Remedies how to darken white hair at home | ना जास्त खर्च, ना केमिकल्सचा वापर नॅचरल पद्धतीने काही दिवसात काळे होतील पांढरे केस!

ना जास्त खर्च, ना केमिकल्सचा वापर नॅचरल पद्धतीने काही दिवसात काळे होतील पांढरे केस!

White hair home Remedies : सगळ्यांनाच लांब, चमकदार, काळे केस हवे असतात. मात्र, आजकालच्या चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे कमी वयातच केस पांढरे होतात आणि गळू लागतात. तणाव, पोषणाची कमतरता, हार्मोनल असंतुलन किंवा जेनेटिक कारणांमुळे केसांचा रंग जातो. अशात काही घरगुती उपाय ही समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. या उपायांच्या मदतीने नॅचरल पद्धतीने केस पुन्हा काळे करता येतात.

केस काळे करण्याचे उपाय

कढी पत्ता

कढीपत्त्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण भरपूर असतात. याद्वारे तुम्ही सहजपणे केस काळे करू शकतात. यासाठी खोबऱ्याच्या तेलात कढीपत्त्याची काही पाने गरम करा. पानं काळे होईपर्यंत तेल गरम करावं. तेल थंड झालं की, या तेलाने नियमितपणे डोक्याच्या त्वचेची मालिश करा. काही दिवसात फरक दिसेल. 

खोबऱ्याचं तेल आणि लिंबू

खोबऱ्याचं तेल आणि लिंबू दोन्ही केससांठी खूप फायदेशीर गोष्टी आहेत. या तेलात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे केस मजबूत आणि चमकदार करतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे केस हेल्दी आणि मजबूत करतं. खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचं मिश्रण केसांवर लावा. हे तेल केसांवर ३० मिनिटांपर्यंत लावून ठेवा आणि नंतर शाम्पूने केस धुवून घ्या. याने केस काळे होण्यास मदत मिळेल.

आवळा

पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचं सेवनही करू शकता. आवळ्याचं तुम्ही ज्यूस, फळ आणि पावडरच्या रूपात सेवन करू शकता. याने पांढरे केस लवकर काळे होण्यास मदत मिळते. 

चहा पावडर

केस काळे करण्यासाठी चहा पावडरचा वापर करू शकता. याने पांढरे केस काळे होण्यास मदत मिळेल. एका ग्लास पाण्यात चहा पावडर उकडून घ्या. हे पाणी थंड होऊ द्या. नंतर हे पाणी केस आणि डोक्याच्या त्वचेवर लावा. साधारण १ तासांनंतर केस पाण्याचे धुवून घ्या. काही दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला फरक दिसेल.

कांद्याचा रस

पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याचा रसही रामबाण उपाय ठरतो. कांद्याच रस केसांच्या मुळात चांगल्या प्रकारे लावा. साधारण ३० मिनिटांनी केस चांगले धुवा. याने केस चमकदार, मुलायम होतील आणि काळेही होतील.

Web Title: White hair home Remedies how to darken white hair at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.