इंग्रजीच्या पेपरला ११ भावी गुरुजी रस्टिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:17 AM2018-06-05T01:17:01+5:302018-06-05T01:17:01+5:30
बीड : डीटीएड परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या ११ भावी गुरुजींवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने सोमवारी बीड येथे ही कारवाई केली. परीक्षेच्या तीन दिवसात बीड व अंबाजोगाईत २५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
तीन दिवसांपासून शिक्षण पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा सुरु आहे. सोमवारी बीड येथील स्वामी विवेकानंद अध्यापक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाची परीक्षा सुरु होती. या केंद्रावर भरारी पथकाने अचानक तपासणी केली. या वेळी कॉपी करताना आढळलेल्या ११ परीक्षाथींवर रस्टिकेटची कारवाई झाली. शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, उपशिक्षणाधिकारी नजमा, मोहनराव काकडे, विस्तार अधिकारी मोहनराव काकडे यांचा या पथकात समावेश होता.
बीड येथील स्वामी विवेकानंद अध्यापक विद्यालय केंद्रावर परीक्षा सुरु असून ३६८ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. सोमवारी ३२ जण गैरहजर होते. १ ते ३ जून दरम्यान या केंद्रावर एकूण १७ जणांना रस्टीकेट करण्यात आले आहे. अंबाजोगाई येथील गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळा परीक्षा केंद्रावर डी.टी.एड. परीक्षेत कॉपी करणाºया आठ जणांना शुक्रवारी रस्टिकेट करण्यात आले. प्राचार्य डॉ. विनोद देवगावकर, प्राचार्य डॉ. लांडगे व डॉ. राजेश गोरे यांना तपासणी दरम्यान आठ जण कॉपी करताना आढळले. या केंद्रात ३६० विद्यार्थी परीक्षा देत आहेत.