ट्रेनमधून उतरलेल्या तिघांचा शाळेत जाणाऱ्या कामगाराच्या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 04:39 PM2024-12-04T16:39:51+5:302024-12-04T16:42:22+5:30

पीडिता गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर प्रकरण उघडकीस

15-year-old daughter of brick kiln worker assaulted while going to school, victim pregnant | ट्रेनमधून उतरलेल्या तिघांचा शाळेत जाणाऱ्या कामगाराच्या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार

ट्रेनमधून उतरलेल्या तिघांचा शाळेत जाणाऱ्या कामगाराच्या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार

कडा (जि. बीड) : तालुक्यातील एका गावात वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या परजिल्ह्यातील कामगाराच्या १५ वर्षीय मुलीवर रेल्वेतून उतरलेल्या तिघांनी अत्याचार केल्याची घटना पीडिता ९ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर उघड झाली. याप्रकरणी तिघांविरुद्ध सोमवारी आष्टी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील एक कुटुंब मागील दोन वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यातील एका गावात वीटभट्टीवर कामासाठी आले होते. याच कालावधीत मार्च २०२४ नक्की तारीख माहीत नाही. अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी याच गावातील शाळेत रेल्वे पटरीच्या बाजूने जात असताना अनोळखी तिघे जण रेल्वेतून उतरले व यातील दोघांनी तिच्या हाताला धरून शेजारच्या शेतात नेले. यातील एकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली. पीडिता यातून ९ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून २ डिसेंबर रोजी अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे करीत आहेत.

Web Title: 15-year-old daughter of brick kiln worker assaulted while going to school, victim pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.