३१ हजार शेतकऱ्यांना २१६ कोटींचे पीककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:37 AM2018-07-06T00:37:07+5:302018-07-06T00:37:41+5:30
खरीप हंगामात शेतकºयांना वेळीच पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना शासन स्तरावर तसेच जिल्हा प्रशासनाकडून मिळत असल्यातरी अद्याप पीककर्ज वाटपाला गती मिळालेली दिसत नाही. हंगामातील जुलै उजाडला तरी आतापर्यंत केवळ ३१ हजार २६९ खातेदार शेतकºयांना २१६ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खरीप हंगामात शेतकºयांना वेळीच पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना शासन स्तरावर तसेच जिल्हा प्रशासनाकडून मिळत असल्यातरी अद्याप पीककर्ज वाटपाला गती मिळालेली दिसत नाही. हंगामातील जुलै उजाडला तरी आतापर्यंत केवळ ३१ हजार २६९ खातेदार शेतकºयांना २१६ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीककर्ज वाटपाचे हे प्रमाण अवघे १० टक्के इतके आहे.
बीड जिल्ह्यात १ लाख ५० हजार १७४ शेतकºयांना ७१७ केटी रुपयांची र्जमाफी झाली आहे. तर चालू खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी २१४२.१६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १९ मे पासून जिल्ह्यातील सर्व बॅँकांच्या जिल्हास्तरीय बॅँकर्स समितीच्या बैठका जिल्हाधिकाºयांनी घेतल्या. दर शुक्रवारी बॅँकांच्या नोडल अधिकाºयांची आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले.
त्यानंतरही बॅँकाकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी नोटीसा बजावल्या होत्या. तर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी आलेले मंत्री समितीचे सदस्य तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही बॅँकांना कर्जमाफी संदर्भात तसेच पीककर्ज वाटपाबाबत निर्देश दिले होते.
दरम्यान पीककर्ज वाटपात बॅँकांची भूमिका उदासीन असल्याचा आरोप शेतकरी प्रश्नांवर लढणारे नेते करत आहेत. पीककर्ज मागणी आल्यानंतर लवकरात लवकर कर्जवाटपाबाबत निर्देश असताना अद्यापही गती दिसून आलेली नाही. खरीप हंगामात ५ जुलैपर्यंत ३१ हजार २६९ खातेदार शेतकºयांना २१६ कोटी ६२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. कर्जवाटपाचे हे प्रमाण १०.११ इतके असून ते वाढविण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरवा सुरु आहे.
सहा बॅँकांतून बºयापैकी : इतर बॅँका मागे
जिल्ह्यात मराठवाडा ग्रामीण बॅँकेने ८४ कोटी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने ३४ कोटी, एसबीआयने २७ कोटी आणि बॅँक आॅफ महाराष्टÑने १२ कोटी ४८ लाख, बॅँक आॅफ बडोदाने ९ कोटी ८० लाख, सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाने ६ कोटी ३३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उर्वरित १२ बॅँकांमधून करण्यात आलेल्या पीककर्जाचा आकडा अत्यंत कमी आहे.
पावसाची प्रतीक्षा
पावसाचा जोर वाढताच पीककर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मागील वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. मोठ्या पावसाची त्यांना प्रतीक्षा आहे. त्यानंतरच पेरण्यांचाही टक्का वाढणार आहे.