आष्टी : राज्य परिवहन महामंडळाच्या बसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता लांब पल्ल्यांच्या पंचवीस बस प्रवाशांच्या सेवेसाठी सॅनिटायझर करुन आष्टी आगारातून सुरु केल्या असल्याची माहिती आष्टी आगारप्रमुख संतोष डोके यांनी दिली.
ग्रामीण भागातील बस सुरु करण्यासाठी जर ग्रामपंचायतीने लेखी मागणी केली तर ग्रामीण भागातील बससेवा आणखी लवकरात लवकर सुरु होईल, अशी माहिती ही डोके यांनी देखील दिली.
आष्टी आगारातून दररोज लांब जाणाऱ्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, बीड, नगर, परळी, कल्याण, परभणीसह आदी शहरात जाणाऱ्या बस रोज सॅनिटायझर करुन रवाना करण्यात येत आहेत. वाहक चालकांना कोविडचे नियम पाळण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत, असेही डोके यांनी दिली.