बीड : वारंवार गैरहजर राहणे, नियमित कर्तव्य न बजावणे, ‘अॅडजस्टमेंट’ करणे, खाजगी सेवा देणे इ. कारणांमुळे जिल्ह्यातील १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी ही कारवाई केली. ‘लोकमत’ने वारंवार हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यावर सीईओंनी गंभीर दखल घेत ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता कामचुकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी मुख्यालयी राहुन सेवा देत नाहीत. हलगर्जीपणा करण्यासह न सांगता गैरहजर राहणे, नियमित आरोग्य संस्थेत न जाणे, एकमेकांत अॅडजस्टमेंट करणे आदी प्रकार वाढले होते. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार निदर्शनास आणला. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. सीईओ कुंभार यांनी याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाची कानउघाडणी केली. तसेच ज्यांचे गैरवर्तन आहे, अशांची यादी मागवित त्यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. अशा कारवायांमुळे कामचुकारांना दणका बसून आरोग्य सेवा सुरळीत होईल. यात सातत्य राहण्याबरोबरच हा वचक कायम ठेवण्याचे आव्हानही सीईओ कुंभार यांच्यासमोर आहे. अनेक महिन्यांनी अशी कारवाई झाल्याने कामचुकारांची पायाखालची वाळू सरकली आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी कारवाईच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.हेच ते डॉक्टर : नोटीस देऊनही झाली नाही सुधारणाताडसोन्ना आरोग्य केंद्रातील डॉ. सिराज एम इलियास व डॉ.जोहरी जबीन एम सिराज, अंमळनेरचे डॉ.परमेश्वर बडे, डॉ.खरमाटे, निपानी जवळकाचे डॉ. धनंजय माने, जातेगावचे डॉ. प्रकाश फड, भोगलवाडीचे डॉ. एम.ए.लगड, सोन्नाथडीचे डॉ.संदीप बटुळे, पोहनेरचे डॉ.अरूण गुट्टे, वाहलीचे डॉ.मोहित कागदे, गेवराई नागरी रुग्णालयाचे डॉ.काकडे यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. या सर्वाना वारंवार नोटीस देऊनही यांच्यात सुधारणा झालेली नव्हती, असे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.ताडसोन्ना, अंमळनेर, वाहली वाद्ग्रस्तबीड तालुक्यातील ताडसोन्ना व पाटोदा तालुक्यातील अंमळनेर आणि वाहली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत.नियमित सेवा न देण्याबरोबरच अॅडजस्टमेंट करण्यात ते ‘तरबेज’ आहेत. अंमळनेर येथील एका डॉक्टरने तर वैद्यकीय रजा टाकल्याचे समजते.
१२ डॉक्टरांना ‘इंजेक्शन’; सीईओंनी रोखली वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:19 PM
वारंवार गैरहजर राहणे, नियमित कर्तव्य न बजावणे, ‘अॅडजस्टमेंट’ करणे, खाजगी सेवा देणे इ. कारणांमुळे जिल्ह्यातील १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी ही कारवाई केली.
ठळक मुद्देकारवाई : ‘तडजोडी’, आरोग्य केंद्रातून दांड्या मारणे अंगलट; कामचुकारांचे धाबे दणाणले