बीडमध्ये ६० वर्षांच्या आजिबार्इंनी केला नेत्रदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 07:10 PM2018-12-06T19:10:23+5:302018-12-06T19:11:40+5:30
स्वत: पुढे येऊन नेत्रदानाचा संकल्प करणारे अपवादात्मकच असतात
बीड : महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील एका ६० वर्षीय आजीबार्इंन स्वईच्छेने जिल्हा रूग्णालयात येऊन नेत्रदानाचा संकल्प केला. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. स्वत: पुढे येऊन नेत्रदानाचा संकल्प करणारे अपवादात्मकच असतात, असे सांगण्यात आले.
चंद्रभागा ससाणे या बीड तालुक्यातील च-हाटा येथील रहिवाशी. मागील २० वर्षांपासून त्या सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत. गावात बचतगट उभारून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच ग्रामीण भागात शासनाच्या योजना इतर माध्यमांची जनजागृती नसते. मात्र चंद्रभागा यांना काही दिवसांपूर्वी अवयव दानाचे महत्व एकाने समजून सांगितले होते. हे त्यांनी चांगलेच लक्षात ठेवले. गुरूवारी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून चंद्रभागा यांनी स्वता: रूग्णालयात येऊन नेत्रदानाचा संकल्प केला. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांचा रूग्णालयाच्यावतीने सन्मान करण्यात आला. येथील नेत्रदान समुपदेशक सी.एस.गुरव यांनीही त्यांचे समुपदेशन केले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे आजीबाईंनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, अधिपरिचारीका विजया सांगळे, डॉ.राधेशाम जाजू, डॉ.आर.आर.राठोड, डॉ.सी.एस.वाघ, नेत्रदान समुपदेशक सी.एस.गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, आरएमओ डॉ.सतीश हरीदास यांनी ससाणे यांचे स्वागत केले.