पर्यावरण संवर्धनासाठी लावली ६०० झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:15+5:302021-06-30T04:22:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : शहरातील निसर्गप्रेमी युवकांनी एकत्रित येत तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तब्बल ६०० झाडे लावली ...

600 trees planted for environmental conservation | पर्यावरण संवर्धनासाठी लावली ६०० झाडे

पर्यावरण संवर्धनासाठी लावली ६०० झाडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : शहरातील निसर्गप्रेमी युवकांनी एकत्रित येत तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तब्बल ६०० झाडे लावली आहेत. या झाडांचे वर्षभर संवर्धन करण्याची शपथ या तरुणांनी घेतली आहे.

धारूर तालुक्याला निसर्गसौंदर्य डोंगर लाभले आहेत. परंतु दिवसेंदिवस मानवाच्या चुकांमुळे हे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भूमाफियांनी अनेक प्रकारे या निसर्गाच्या सौंदर्यावर अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. ही पर्यावरण सौंदर्य कुठेतरी जतन केले पाहिजेत. या उदात्त भावनेतून शहरातील नवतरुणांनी एकत्रित येऊन एक पर्यावरणासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. आजची तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आपल्याला दिसून येते. वेगवेगळी फॅशन, डिजिटल इंडिया अशा रोषणाईमध्ये आजचा तरुण बुडाला आहे. परंतु धारूर शहरातील तरुणांनी पर्यावरण सौंदर्यासाठी हाती घेतलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी तब्बल ६०० झाडे मैंदवाडी रोडवरील डोंगर भागात लावून ती जतन करण्याची प्रतिज्ञा केली आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

या उपक्रमात कृष्णा सावंत, अश्रुबा घोडके, अतुल शिनगारे, प्रसाद शिनगारे, अमोल जगताप, प्रदीप जाधव, गोविंद बक्षी, संतोष खामकर, अरविंद लोंढे, प्रीतम नांदेडकर, वैजिनाथ लांब, गोविंद साखरे, शुभम वैष्णव, महेश भैरे, सूरज तिबोले, अक्षय गोरे या निसर्गप्रेमी तरुणांनी एकत्रित येत तब्बल सहाशे झाडांची लागवड केली आहे.

...

श्रमदानाने खोदले खड्डे

गुलमोहर, सीताफळ, चिंच, लिंब, करंजी, साग, वड अशा विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे. स्वतःचा खड्डे खोदून त्यांनी ही वृक्षलागवड केली. यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात धारूरच निसर्गसौंदर्याने नटलेले दिसून येईल. पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचीदेखील उपलब्धता होईल, यात मात्र तिळमात्र शंका नाही.

...

===Photopath===

290621\img-20210628-wa0127.jpg

===Caption===

मैंदवाडी रोडवरील डोंगरावर धारूर शहरातील युवकांनी ६०० झाडांचे रोपन करुन ती जोपासण्याचा संकल्प केला आहे.

Web Title: 600 trees planted for environmental conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.