बोंडअळीसोबतच कापसावर मावा रोगाचाही मारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:12 AM2018-08-24T01:12:32+5:302018-08-24T01:13:42+5:30
पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हाती लागतील का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला आहे. मुख्य पीक असलेल्या कापसावर मात्र बोंडअळीचा व मावा, मिलीबग, मर या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हाती लागतील का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला आहे. मुख्य पीक असलेल्या कापसावर मात्र बोंडअळीचा व मावा, मिलीबग, मर या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पावसाने ओढ दिल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, यासह इतर पिकांची वाढ खुंटली आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. मात्र, कापसावर आलेले सगळ््यात मोठे संकट म्हणजे बोंडअळीचे होय. कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये बोंडअळीसोबतच मावा, मिलीबग या रोगांचा प्रादुर्भाव देखील दिसून आल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बोंडअळीचा प्रदुर्भाव हा बोंडांमध्ये होतो, तर मावा व मिलीबग हे झाडातील रस शोषून घेतात. यामुळे झाडांची वाढ पूर्णपणे खुंटते व याचा संसर्ग सर्वत्र पसरत जातो. अशा प्रकारे प्रादुर्भाव असणारी झाडे जर शेतात आढळली व त्यांची संख्या कमी असेल तर उपटून टाकावीत, तसेच बोंडअळीला रोखण्यासाठी केल्या जाणाºया फवारण्या वेळेवर केल्या तरी देखील बोंडअळीसोबतच, मावा व मिलीबग रोगाचा व किडीचा होणारा दुष्परिणाम रोखता येऊ शकतो असे कृषीविभागाचे अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले.
वेळेवर उपायोजना केल्या तरच पिकांवरील किडी व रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पदनात अधिक घट होणार नाही असे मत कृषीविद्यापीठाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.