वडवणी तालुक्यात पेरणीसाठी लगबग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:37+5:302021-06-19T04:22:37+5:30
गतवर्षी कापसावर बोंडअळी पडली होती. त्यामुळे कापसाचा उतारा कमी आला. गतवर्षीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा यावेळेस ...
गतवर्षी कापसावर बोंडअळी पडली होती. त्यामुळे कापसाचा उतारा कमी आला. गतवर्षीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा यावेळेस कमी केला आहे.
दुसरीकडे सोयाबीन हे नगदी पीक आहे. या पिकाचा पैसा हातात लवकर पडतो. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा जास्त घेत असल्याचे चित्र दिसत आहे. गत पाच-सहा दिवसांपासून कवडगाव व वडवणी मंडळातील सर्व गावात परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. दमदार पाऊस पडत असल्यामुळे सध्यातरी शेतकरी आनंदी दिसत आहे. कवडगाव देवडी मामला लिमगाव काडीवडगाव खापरवाडी, साळीबा, चिंचोटी, सोन्ना, खडकी, पुसरा, चिंचाळा, कुप्पा आदी गावांमध्ये पेरण्या जवळपास आटोक्यात आल्या आहेत. सोयाबीन मूग, उडीद आदी पिकेही शेतकऱ्यांनी पिकाबरोबरच कापूस, तूर, ऊस घेतली आहे.
===Photopath===
180621\rameswar lange_img-20210618-wa0012_14.jpg