परळी : जगाला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव विसरु देणार नाही, अशा पध्दतीने आपण काम करणार असल्याची घोषणा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील आयोजित कार्यक्र मात केली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुढच्या वर्षी ३ जुनला गोपीनाथगडावरील कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून येतील, असा विश्वास व्यक्त करताना यासाठी आपले योगदान राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.परळी तालुक्यातील पांगरी येथे गोपीनाथगड येथे सोमवारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पंचम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्र मात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्यासारखा संघर्ष कुणाच्या वाट्याला येऊ नये. घरी संघर्ष, बाहेर संघर्ष, जिल्ह््यात संघर्ष मला करावा लागला, काही जणांकडून जाती पातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यास मतदारांनी थारा दिला नाही. माझ्या कातड्याचे जोडे करु न घातले तरी नागरिक मतदारांचे ऋण फिटणार नाहीत. ३ जून हा मुंडे साहेबांचा स्मृतिदिन. हा दिवस आमचे सर्वस्व हरवल्याचा दिवस आहे. परंतु मुंडे साहेबांची लेक असल्याने रडत न बसता लढण्याचा निर्धार करु न आपण संघर्ष स्वीकारल्याचे त्या म्हणाल्या.व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, महादेव जानकर, नविनर्वाचित खा. सुधाकर शृंगारे, संजय जाधव, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, डॉ सुजय विखे पाटील, ओमराजे निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर, आ.सुरजीतसिंह ठाकूर, तानाजी मुरकुटे, आ.अतुल सावे, आ. मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, विनायक पाटील, आ. मोहन फड, आ.तानाजी मुटकुळे, आ. आर. टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.लक्ष्मण पवार, आ.संगीता ठोंबरे, आ. माधुरी मिसाळ, भागवत कराड, बाळासाहेब दोडतले, रासपाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड, शिरीष बोराळकर, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, हभप राधाताई सानप, रमेश पोकळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक खा. डॉ.प्रीतम मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन राम कुलकर्णी यांनी केले. तर भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी गट्टे यांनी आभार मानले.लोकनेते गोपीनाथ मुंडे...ना थकले..ना थांबले..ना झुकले..सोमवारी गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात विविध नेत्यांनी लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व विलक्षण होते. मुंडे - महाजन यांच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. १९७५ ला औरंगाबाद येथे सोबत राहिलो. आणीबाणीच्या काळात केलेला संघर्ष आणि भाजप तळागाळातील लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांचे योगदान वादातीत आहे. गोपीनाथ मुंडे ना थकले -ना थांबले -ना झुकले अशा आठवणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जागवल्या.लोकनेते गोपीनाथ मुंडे व विखे पाटील घराण्याचे ऋणानुबंध हे जुनेच आहेत. आमच्या संकटकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपने साथ दिली. माझ्या विजयात पंकजाताई मुंडे यांचे योगदान मोठे असून मी पंकजातार्इंमुळेच खासदार असल्याचे नगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी सांगितले.पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात सदैव कर्तृत्व सिद्ध केले आहे. याचा अभिमान वाटतो. मुलगी असावी तर पंकजाताईसारखी कर्तृत्ववान मुलगी असावी असा गौरव माढ्याचे खा.रणजितिसंह नाईक निंबाळकर यांनी केला.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रदीर्घ सहवासात राहण्याचे भाग्य लाभले. नेता कसा असावा तर मुंडे यांच्या सारखा हे मी असंख्य वेळा अनुभवले आहे. असंख्य आठवणी जाग्या होतात. गोपीनाथराव मुंडे यांच्या सहवासातूनच आपला सरपंच ते केंद्रीय मंत्री असा चढता आलेख राहिल्याचे केंद्रीय मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.लोकनेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे गोपीनाथ मुंडे. तोच वारसा पंकजाताई पुढे नेत आहेत. ताई तुम्ही फक्त हाक द्या, लहान भाऊ म्हणून सदैव धावत येईन, असे परभणीचे शिवसेना खा. बंडू जाधव म्हणाले.संपूर्ण मराठवाड्यात भाजप सेनेचे खासदार विजयी व्हावेत तसेच नांदेडमधून मी खासदार व्हावे अशी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची इच्छा होती. मी नांदेडचा खासदार झालो; मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले अशी भावना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.हुकमी एक्क्याची गरजच पडली नाहीखुप लोकांनी दु:ख यातना दिल्या.पण मी डगमगले नाही. या निवडणुकीत मला अनेक लोकांनी शिकवलं. मी लोकांचं ऐकलं पण मनाचं केलं. कारण ‘खेल ताश का हो या जिंदगी का, अपना एक्का तबही दिखाना जब सामने बादशहा हो’ अशी मुंडे साहेबांची शिकवण होती, असे पालकमंत्री म्हणाल्या.लोकांचा विश्वास जिंकलाय आता विकास करायचाय अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘जो दर्द तुम किश्तो किश्तो में दे रहे हो, वो आलम क्या होगा जब हम ब्याजसमेत वापिस करेंगे’ असे म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
पुढच्या वेळेस सुध्दा फडणवीसच मुख्यमंत्री राहतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:57 PM
जगाला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव विसरु देणार नाही, अशा पध्दतीने आपण काम करणार असल्याची घोषणा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील आयोजित कार्यक्र मात केली.
ठळक मुद्देपंकजा मुंडेंचा विश्वास : जगाला गोपीनाथ मुंडे यांचे नाव विसरु देणार नाही, मतदार जनतेचे ऋण विसरणार नाही