अंबाजोगाई पंचायत समिती प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:34 AM2018-10-15T00:34:50+5:302018-10-15T00:35:28+5:30
महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१६-१७ सालासाठी राज्यातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या पंचायत समित्यांना राज्यस्तरीय व विभागीयस्तरावर पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्यात अंबाजोगाई पंचायत समितीला विभागीयस्तरावरील प्रथम क्रमांकाचा १२ लाख रु पयांचा ‘यशवंत पंचायत राज अभियान’चा पुरस्कार जाहीर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१६-१७ सालासाठी राज्यातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या पंचायत समित्यांना राज्यस्तरीय व विभागीयस्तरावर पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्यात अंबाजोगाईपंचायत समितीला विभागीयस्तरावरील प्रथम क्रमांकाचा १२ लाख रु पयांचा ‘यशवंत पंचायत राज अभियान’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर आठ लाखांचा द्वितीय पुरस्कार परळी पंचायत पं.स.ला जाहीर झाला आहे.
अंबाजोगाई पं.स.चे गटविकास अधिकारी दत्ता गिरी यांच्या कुशल प्रशासनाखाली सर्व कर्मचारी वर्गाने स्वच्छता, पं.स.चे सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवणे या बाबींवर विशेष भर दिला. या मुद्यांच्या आधारेच हे पुरस्कार दिले जातात.
सदरील सर्व बाबतीत परिपूर्ण असल्याचे निदर्शनास असल्याने अंबाजोगाई पंचायत समितीला हा बहुमान प्राप्त झाला आहे. याकामी गटविकास अधिकारी गिरी यांना अंबाजोगाई पं.स.चे तत्कालीन सीडीपीओ विठ्ठल नागरगोजे, शाखा अभियंता आर.बी. काळे, पं.स. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राहुल देशमुख, कक्षाधिकारी नीलकंठ दराडे, अधीक्षक तुकाराम झाडे, ग्रामसेवक संघटना तसेच सर्व कर्मचारी आणि सेवकांचे योगदान लाभले. पं.स. सभापती मीना भताने, उपसभापती तानाजी देशमुख आणि इतर सर्व सदस्यांनी अधिकारी, कर्मचाºयांना प्रोत्साहन दिले. लवकरच मुंबई येथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे आहे. मागील वर्षी अंबाजोगाई पंचायत समितीला विभागात द्वितीय पारितोषिक मिळाला होता. या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पं.स.चा रेकॉर्ड अद्यावत ठेवण्यावर भर
अंबाजोगाई पं.स.चे गटविकास अधिकारी दत्ता गिरी यांच्या कुशल प्रशासनाखाली सर्व कर्मचारी वर्गाने स्वच्छता, पं.स. चे सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवणे या बाबींवर विशेष भर दिला. या मुद्यांच्या आधारे हा पुरस्कार दिला गेला
याबाबींची खातरजमा केल्याचे निदर्शनास आल्याने अंबाजोगाई पं.स.ला हा बहुमान प्राप्त झाला आहे.