लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी बुधवारी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जाहीर केली. यावेळी आष्टी सोडून इतर पाच विधानसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केले.परळी विधानसभा मतदार संघातून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, माजलगावमधून प्रकाश सोळंके, बीडमधून संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी यावेळी घोषित केली. दरम्यान आष्टी मतदारसंघाचा निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाणार असल्येच पवार म्हणाले. ते बीडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते.यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री शिवाजीराव पंडित, प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके, राज्याच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, मेहबुब शेख यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान डी.बी. बागल, मा.आ.सय्यद सलीम, सुनिल धांडे, संदीप क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात विजय मिळवायचा आहे. राष्ट्रवादीतून राजे गेले, सेनापती गेले, सरदार गेले. कावळे होते ते ही गेले इथं आता फक्त मावळे शिल्लक असल्याचे मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. शिवरायांच्या स्वराज्यातही पेशवाईने फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. आता २१ व्या दशकातही महाराज पंतांना शरण गेले अशी टिकाही त्यांनी यावेळी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली. तसेच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी सोलापूर येथे पवार यांच्यावर टिका केली होती. मात्र, गुजरातमध्ये जितकी बसस्थानक नाहीत, तितकी विमानतळ महाराष्ट्रात शरद पवार यांनी निर्माण केले आहेत. शिवरायांचे विचार समोर ठेऊन शरद पवार यांनी राज्यात महिला धोरण राबविले. ५५ वर्षांच्या कारकिर्दीत पवारांनी अठरा-पगड जातींना सोबत घेऊन काम केले. अनेकांना वषार्नुवर्षे आमदार, खासदार, मंत्रीपदे दिली. रिपाइंच्या रामदास आठवले यांच्यासह वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे आता शरद पवार यांच्यावर टिका करत आहेत. परंतु त्यांना हा नैतिक अधिकार नाही. कारण जातीपातीचे राजकारण पवारांनी कधी केले नाही. आठवले व आंबेडकर यांच्यसह इतर दलित चवळवळीतील नेत्यांना खुल्या प्रवार्गातून निवडूण आणले होते. याची इतिहासात नोंद आहे.राज्याचे मुख्यमंत्री पारदर्शक सरकार चालवत असल्याचे सांगत फिरतात. मात्र, राष्ट्रवादीत असताना बबनराव पाचपुते, राजेंद्र गावित, मधुकर पिचड हे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस करत होते. आता त्यांना पक्षात घेऊन पवित्र केले का असा सवाल यावेळी मुंडे यांनी विचारला.दरम्यान बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत कोण रुसले, असं म्हणत पालकमंत्री पंकजा मुंडे व मेटे वादाची खिल्ली उडवली. शरद पवारांनी बीड जिल्ह्यावर केले, त्यांच्या प्रेमाची उतराई करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडूण द्या, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन मुंडेंनी केले.महाराज पंतांना शरण गेले - धनंजय मुंडेइतिहासात दोन छत्रपतींमध्ये फुट पाडण्याचे काम आनाजी पंतांनी केले होते. मात्र, वर्तमानात राजेच पंतांना शरण गेल्याचे चित्र आहेत, अशी टीका साताऱ्याचे माजी खा. उदयनराजे भोसले व मा.आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात केली.शरद पवारांनी साधला प्रमुख नेत्यांशी संवादखा. शरद पवार हे उस्मानबादची सभा संपवून, मंगळवारी रात्री उशिरा बीड येथे आले होते. यावेळी माजी आ. अमरसिंह यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्यासंदर्भात सल्ला मसलत केली.पंकजांनी राष्ट्रवादीची चिंता करु नयेमेळाव्यात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या बीडच्या पालकमंत्री म्हणाल्या राष्ट्रवादीला भविष्य नाही. मात्र, आपण त्याची चिंता करु नका.ज्या जिल्ह्याच्या आपण पालकमंत्री आहात तसेच महिला, बालकल्याण खाते आपल्याकडे आहे. तरी देखील जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारा, भ्रूणहत्या, गुन्हेगारी वाढलेली आहे असे म्हणत चाकणकर यांनी पंकजा यांच्यावर टीका केली.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिलेल्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पवारांकडून उमेदवारांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 1:09 AM