वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:37 AM2021-01-16T04:37:32+5:302021-01-16T04:37:32+5:30

अस्ताव्यस्त पार्किंग बीड : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात नो पार्किंगच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक वाहने लावत ...

Appeal to stop deforestation | वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन

वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन

Next

अस्ताव्यस्त पार्किंग

बीड : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात नो पार्किंगच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक वाहने लावत आहेत. त्यामुळे परिसर विद्रुप दिसत आहे. इतरांना नियम दाखवणारे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी येथे मात्र कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सामान्यांमध्ये संताप आहे.

रिक्षातून अवैध वाहतूक

वडवणी : बीड, वडवणी, तेलगाव या महामार्गावर रिक्षा, जीपमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक शाखेने या भागातही विशेष मोहीम राबवून अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आहे.

विजेचा लपंडाव

बीड : शहरातील स्वराज्यनगर, मित्रनगर, बार्शी रोड परिसरातील वीज अनेकदा जात आहे. महावितरणकडून याचे कसलेही नियोजन केले जात नसल्याचा आरोप या भागातील रहिवाशांनी केला आहे. बिले भरूनही सुरळीत वीज मिळत नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Appeal to stop deforestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.