अंबाजोगाई -आडस रस्त्यावर तब्बल ११७ किलो गांजा जप्त; पाच जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 02:13 PM2024-02-02T14:13:00+5:302024-02-02T14:14:40+5:30

या कारवाईत एक क्विंटल सतरा किलो गांजासह स्कार्पिओ गाडी, दोन मोबाईल व तीन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

As many as 117 kg ganja seized on Ambajogai-Adas road; Five people in custody | अंबाजोगाई -आडस रस्त्यावर तब्बल ११७ किलो गांजा जप्त; पाच जण ताब्यात

अंबाजोगाई -आडस रस्त्यावर तब्बल ११७ किलो गांजा जप्त; पाच जण ताब्यात

धारुर (बीड) : पोलीस उपअधिक्षक कार्यालय केज व धारुर पोलिसांनी गुरूवारी सांयकाळी  सुमारास धाडसी संयूक्त  कारवाई केली. या रस्त्याने जाणारे एका पोलीस कर्मचाऱ्यांला संशय आल्याने त्याने धारूर पोलीस स्टेशनला कळवल्याने हि कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेतले असून तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 117 किलो गांजा जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई -आडस रस्त्यावर आडस येथे बेकायदेशीररित्या व विनापरवाना चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्कार्पीओ ( क्र. एम एच 23 वाय 0714) या वाहनातून गांजा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या रस्त्याने जाणारा पोलीस कर्मचारी प्रशांत मस्के याला संशय आल्याने धारूर पोलीसानी अंबाजोगाई ते आडस रस्त्यावर ही गाडी अडवून तपासणी केली हि कारवाई  रात्री साडेसहा  ते पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलीस पथकाने कारवाई केली.

या कारवाईत एक क्विंटल सतरा किलो गांजासह स्कार्पिओ गाडी, दोन मोबाईल व तीन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. पाच आरोपी वर गुन्हा दाखल केला आहे  ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिक्षक कमलेश मीना, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे, प्रशांत मस्के, जमीर शेख, विकास चोपने, अशफाक इनामदार, नाना निंगुळे, नितिन काळे, परमेश्वर वखरे, धम्मानंद गायसमुद्रे, मुकेश खरटमोल, मल्लिकार्जून माने, श्रीमती दिक्षा चक्के, तुकाराम चांदणे गोंविद मुंडे यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने केली. पोलीसाचे या कारवाईचे सर्वञ कौतूक हौत आहे.

Web Title: As many as 117 kg ganja seized on Ambajogai-Adas road; Five people in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.