मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सुंदर गीतांच्या जोरावर अल्प काळातच प्रसिद्धीला आलेले विनायक पवार यांना शाल, पुष्पहार, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
ख्वाडा चित्रपटातील "तुझ्या रूपाचं पडलंय चांदणं, मला भिजू द्या". गाणं वाजू द्या' या सुप्रसिद्ध गीताचे गीतकार विनायक पवार यांच्या "नामुष्कीचे पिढीजात वर्तमान" या काव्यसंग्रहाला कै. विश्वनाथ शंकरराव पवार (से. नि. पोस्टमास्तर) राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्रदान करण्यात आला. ख्वाडाबरोबरच बबन आणि छत्रपती शासन या चित्रपटांसाठी सुद्धा विनायक पवार यांनी गीत लेखन केले आहे.
यावेळी एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, सचिव गोकुळ पवार, कथाकार प्रा. डॉ. भास्कर बडे, अशोक भांडेकर यांच्यासह उपाध्यक्ष माही शेख, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, राजेश बीडकर, व्यंग चित्रकार दीपक महाले, लखूळ मुळे, नितीन कैतके, साजिद भाई, अनिकेत कराड, डाॅ. स्नेहल कराड, लता बडे, कवी जयराम कदम, सरपंच गणेश कदम यांची उपस्थिती होती.
===Photopath===
110621\vijaykumar gadekar_img-20210611-wa0002_14.jpg