बीड : जिल्हा परिषदेच्याशिक्षकांचे वेतन आॅफलाईन अदा करण्यास शासनाने आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये १२ जानेवारीपासून तांत्रिक दोष निर्माण झाल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जून २०१९ पर्यंतचे वेतन आॅफलाईन पद्धतीने अदा करण्यास शासनाने मान्यता दिली होती.ही प्रणाली महाआयटीकडून विकसित केलेली असून सातारा, ठाणे व जालना या तीन जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर शालार्थ प्रणालीमधून जून २०१९ चे वेतन अदा करणे तसेच उर्वरित जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे जुलै २०१९ पासूनचे वेतन अदा करण्याबात याआधीच सूचना निर्गमित केलेल्या आहेत. परंतू सातारा, ठाणे आणि जालना या तीन जिल्ह्यांमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन अदा करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने हे तीन जिल्हे वगळता राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना शालार्थ क्रमांक मिळालेला आहे, शालार्थ क्रमांक मिळविण्यासाठी पात्र आहेत, अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना आॅगस्ट २०१९ पर्यंतचे नियमित व थकित वेतन आॅफलाईन पध्दतीने अदा करण्यास मान्यता दिली आहे.दोष दूर होईपर्यंत चालणार प्रक्रियाबीड जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ९ हजार ५०० शिक्षक तर माध्यमिक शाळांचे १५०० शिक्षक आहेत. डिसेंबर २०१८ पासून या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना आॅफलाईन पध्दतीने वेतन वाटप होत आहे.आता जुलै आणि आॅगस्टचे वेतनही आॅफलाईन पध्दतीने होणार आहेत. शाळा, मंजूर पदे, वेतन मान्य आदी मुद्दयांवर याद्या तयार करुन गटशिणाधिकाºयांकडून हमीपत्र घेतले जाते. हीच प्रक्रिया शालार्थ वेतन प्रणालीतील दोष दूर होईपर्यंत चालणार आहे.
बीड जि.प.शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन मिळणार आॅफलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:32 AM
बीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन आॅफलाईन अदा करण्यास शासनाने आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये १२ ...
ठळक मुद्देशालार्थ प्रणालीतील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष : आॅफलाईनसाठी शासनाकडून मुदतवाढ