बीड : बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी सर्वाधिक पाऊस आष्टी तालुक्यात म्हणजे 38 मिलिमीटर झाला. त्याखालोखाल गेवराई, केज तालुक्यात जवळपास 20 ते 28 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या जवळपास 25 टक्के पाऊस बीड जिल्ह्यात झाला आहे रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या चरणांपासून पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या जवळपास आटोपत आल्या आहेत.
जवळपास आठ दिवसांच्या खंडानंतर हा पाऊस झाल्याने पिकांना आधार मिळाला, नांदुर घाट सर्कलमध्ये 70 मिमी म्हणजे अतिवृष्टी ची नोंद झाली. जिल्ह्याला आता आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे ज्यामुळे जिल्ह्यातील पाजर तलाव आणि धरणातील साठा वाढू शकेल.