शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

१ जानेवारीला बीड जिल्ह्यात राहणार तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 8:00 PM

जादा बंदोबस्तही मागविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बीड : गतवर्षी कोरेगाव भिमा प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यासह राज्यभर उमटले होते. यावर्षी पुन्हा तसा प्रकार होणार नाही, यासाठी बीडपोलिसांनी नियोजन करणे सुरू केले आहे. त्यासाठी १ जानेवारीला बीडमध्ये तगडा बंदोबस्त असणार आहे. 

१ जानेवारीला कोरेगाव भिमा येथे समाजबांधव येथील विजयस्तंभाला आदारांजली अर्पन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी करीत असतात. गतवर्षी किरकोळ कारणावरून मोठा वाद उफाळून आला होता. याचे पडसाद राज्यभर उमटले. बीड जिल्ह्यातही जाळपोळ, दगडफेक असे प्रकार घडले होते. अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी हे प्रकरण शांत केले होते.

यावर्षीही जिल्ह्यात समाजबांधवांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला बंदोबस्त देण्याबरोबरच जिल्हाभर सुरक्षा वाढविण्यात येणार आहे. तसेच जादा बंदोबस्तही मागविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडून सर्व उपविभागीय पोलीस अधिका-यांसह ठाणे प्रमुखांची बैठक घेतली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्रत्येक विभागात होणार बैठकप्रत्येक ठाण्यात समाजबांधवांना आणि विविध संघटनांच्या पदाधिका-यांना बोलावून बैठक घेतली जाणार आहे. तसेच त्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन करण्याबरोबरच विविध सुचना केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील संवेदनशिल ठिकाणी विशेष बंदोबस्त असेल. तसेच या भागात गस्तही असणार आहे.

पोलिसांना सहकार्य करावे १ जानेवारीला बंदोबस्त मागविणार आहोत. तसेच ठाणे प्रमुखांना आतापासूनच बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनाही बोलावून घेत सुचना केल्या जातील. पोलिसांना सहकार्य करावे. काही संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क करावा.- जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीडBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार