लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहर हगणदारीमुक्त करण्यात बीड पालिकेने यश मिळविल्यानंतर आता शहर १०० टक्के स्वच्छ करण्यासाठी पालिकेने कंबर कसली होती. याच्या तपासणीसाठी सोमवारपासून तीन दिवस बीड शहरात केंद्रीय पथक तळ ठोकून राहणार आहे. टॉप १० मध्ये येण्याच्या दृष्टीने पालिकेने प्रयत्न केले आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ अंतर्गत देशातील ४ हजार ४४ नगर पालिका, महापालिका, पंचायत समितींनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. गतवर्षी बीड पालिकेने ३०२ वा क्रमांक पटकावला होता. यावर्षी मात्र पालिकेने चांगलीच परिश्रम घेतले आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात आवाहन केले. तसेच अॅपद्वारे तक्रारी घेऊन त्यांचे निरसन केले. यामध्ये बीड पालिकेला बºयापैकी यश आले. हेच मुद्दे गुण वाढविण्यासाठी लाभदायक ठरणार आहेत.
नागरिकांनीही बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी केले. जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक व्ही.टी.तिडके, भागवत जाधव, सुनील काळकुटे, आर.एस.जोगदंड, भारत चांदणे, ज्योती ढाका, वसीम पठाण, गौरव दुधे, आर.व्ही.डहाळे, आर.व्ही. शिनगारे, स्वाती काकडे, राजू वंजारे यांच्यासह स्वच्छता विभाग परिश्रम घेत आहे.
निकाल पंधरा दिवसांनीकेंद्र शासनाने नियुक्त केलेल्या कारवी डेटा मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही संस्थेची समिती सोमवारी बीडमध्ये येणार आहे. ठरवून दिलेल्या मुद्देनिहाय कामांची ते तपासणी करून आढावा घेऊन कागदपत्रांची तपासणीही करणार आहेत. बुधवारी त्यांची तपासणी संपणार आहे. याचा निकाल साधारण १५ ते २० दिवसानंतर जाहीर होईल, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.तीन हजार ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोडआपल्या भागातील तक्रारी मांडण्यासाठी पालिकेने ‘स्वच्छता अॅप’ सुरू केले होते. याच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचे निरसण करण्यात आले. शहरात जवळपास ३ हजार नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. तसेच १५२१ तक्रारींचे निरसण पालिकेकडून करण्यात आले आहे.
आठ टनावर गांडूळ खताची निर्मितीबीड शहरातून जमा होणाºया ओल्या कचºयापासून पालिकेने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. सध्या ८ टन गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे तर आणखी आठ टन खत बनविण्याच्या तयारीत आहेत. १०० किलो गांडूळ खत विक्री केल्याचेही स्वच्छता विभाग प्रमुख व्ही. टी. तिडके यांनी सांगितले.