पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीच्या मदतीसाठी बीडकर सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:21 AM2019-08-10T00:21:40+5:302019-08-10T00:22:48+5:30

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे नागरिकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मदत करण्याचे आवाहन शुक्रवारी काही तरुणांनी केले होते.

Bidkar rushed to Kolhapur, Sangli for help | पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीच्या मदतीसाठी बीडकर सरसावले

पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीच्या मदतीसाठी बीडकर सरसावले

Next
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : औषध, कपडे, पाणी बॉटल पाठवले

बीड : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे नागरिकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मदत करण्याचे आवाहन शुक्रवारी काही तरुणांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत बीडसह इतर ठिकाणावरुन देखील मोठ्या प्रमाणात मदत गोळा झाली आहे. यामध्ये पिण्याचे पाणी, बिस्कीट, कपडे, औषधे तसेच आर्थिक मदतीचा देखील समावेश आहे. ही मदत प्रशासनाच्या सहाय्याने सांगली, कोल्हापूर येथे पाठवण्यात येत आहे.
पुरस्थितीमुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लाखों कुटुंबाला विस्थापित व्हावे लागले आहे. तसेच अनेकजण अजूनही पुरात आडकलेले असून बचावकार्य सुरु आहे. मात्र, पुरस्थितीमुळे सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आवश्यक असणाºया वस्तू बीड शहरासह जिल्ह्यातून गोळा करुन मदत देण्याचे आवाहन काही तरुणांकडून करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कपडे, बिस्कीट, पाणी बॉटल व इतर वस्तू एकत्र गोळा केल्या आहेत. त्या सर्व वस्तू प्रशासनाच्या साहाय्याने सांगली व कोल्हापूर येथे पाठवल्या जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, पुरग्रस्तांसाठी मदतीसाठी बीडकरांचा हा खारीचा वाटा असल्याची भावना तरुणांनी व्यक्त केली. तसेच मदत ही एक चळवळ असून ती ‘नागरिकांच्या वतीने नागरिकांसाठी’ राबवलेली आहे.

Web Title: Bidkar rushed to Kolhapur, Sangli for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.