औरंगाबाद, बीड, नगर जिल्ह्यात ५ वर्षांपासून विकले बोगस बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 07:35 PM2021-02-16T19:35:15+5:302021-02-16T19:36:55+5:30

आरोपीला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Bogus seeds sold for 5 years in Aurangabad, Beed, Nagar district | औरंगाबाद, बीड, नगर जिल्ह्यात ५ वर्षांपासून विकले बोगस बियाणे

औरंगाबाद, बीड, नगर जिल्ह्यात ५ वर्षांपासून विकले बोगस बियाणे

googlenewsNext
ठळक मुद्दे42 शेतकर्‍यांची केली फसवणूक पाच वर्षापासून करतोय फसवणुकीचा धंदा

- नितीन कांबळे 
कडा- शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन इतरांपेक्षा कमी भावात बियाणे देऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच आष्टी तालुक्यात उघडकीस आला. या फसवणूकीत एका आरोपीला पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता मागील पाच वर्षांपासून तो शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक करत असल्याचे पुढे आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्य़ातील गंगापुर तालुक्यात असलेल्या तांदुळवाडी येथील व्यापारी भगवान घनसिंग सिंहरे यास  अंभोरा पोलिसांनी अटक केली आहे.  गेल्या पाच वर्षापासुन औरंगाबाद, बीड,  नगर येथील तब्बल 42 शेतकऱ्यांना त्याने बोगस कांदा बियाणे विक्री केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. शेतकऱ्यांची गरज ओळखून कमी भावात पावती न देता त्यांना बोगस बियाणे देत असे. ते उगवण्याची हमी नसे. असे करून त्याने लाखो रूपयांचा गंडा शेतकऱ्यांना घातला. मात्र याचे बिंग फुटून तो अंभोरा पोलिसाच्या तावडीत सापडला आहे. याबाबत तपास अधिकारी राहुल लोंखडे यांनी सांगितले की, गुन्ह्या संदर्भात आणखी माहिती मिळणे अपेक्षित असल्याने आरोपीला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Bogus seeds sold for 5 years in Aurangabad, Beed, Nagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.