बांधकाम कामगारांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:42 AM2021-02-25T04:42:18+5:302021-02-25T04:42:18+5:30
ऑक्टोबर २०२० पासून बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतणीकरण ऑनलाईन झालेले आहे. यशस्वी नोंदणी झाल्यावर कामगारास पावती घेवून जाण्यास बीडला ...
ऑक्टोबर २०२० पासून बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतणीकरण ऑनलाईन झालेले आहे.
यशस्वी नोंदणी झाल्यावर कामगारास पावती घेवून जाण्यास बीडला बोलावले जाते. कामगारास एक दिवसाचे काम बुडवून ३०० रुपये तिकीट खर्च करून बीडला जावे लागते. बांधकाम कामगारास नोंदणी ते पावती हातात पडेपर्यंत किमान १००० रूपये खर्च येतो व त्यांचे दोन दिवस काम बुडते.
बांधकाम कामगारांची परेशानी टळावी व त्याचा खर्च कमी व्हावा, काम बुडू नये, त्याचे कल्याणच व्हावे असे मंडळाला वाटत असेल तर त्याच्या नोंदणी पावत्या व स्मार्ट कार्ड दर महिन्याला तालुक्याच्या ठिकाणी कामगारास बोलावून द्यावेत.
अनेक नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटना काम करत आहेत.
बांधकाम कामगारांच्या हिताचा विचार करून बांधकाम कामगार कल्यानकारी मंडळाच्या जिल्हा प्रतिनिधीने दर महिन्याला तालुक्याला येऊन पावत्या वाटप कराव्यात किंवा नोंदीत संघटनेकडे द्याव्यात, अशी मागणी बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे यांनी केली आहे.