नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:03 AM2021-02-18T05:03:46+5:302021-02-18T05:03:46+5:30
बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करून नागरिकांनी शिवजयंती साजरी करताना १०० लोकांच्या मर्यादेत ...
बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करून नागरिकांनी शिवजयंती साजरी करताना १०० लोकांच्या मर्यादेत करावी. त्यावेळी देखील सामाजिक अंतर ठेवून संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.
जिल्ह्याद दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शानाने काही निर्बंध जयंती साजरी करण्यावर घातले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे १०० लोकांना एकत्र येऊन जयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, रॅली मिरवणूकीला परवानगी देण्यात आलेली नाही. मिरवणूक काढल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी कोविडसंदर्भातील नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य कारवे व स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवहान जिल्हा व पोलीस प्रशासनाने केले आहे.
पोलिसांच्या वतीने रूट मार्च
कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून जयंती साजरी करावा, शिवजयंतीच्या पूर्वसंधेला बीड पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च शहरातील तिन्ही पोलीस ठाणे हद्दीतील मुख्य रस्त्यावरून निघाला होता. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.