'छत्रपती अनाजीपंतांना शरण गेले, 21 व्या शतकाचा इतिहास हाच'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:18 PM2019-09-18T15:18:51+5:302019-09-18T15:21:23+5:30
सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस, शिवसेनेकडून मंत्रिपद मिळवलेले जयदत्त क्षीरसागर आणि उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.
बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी होम ग्राऊंडवर फटकेबाजी करताना उदयनराजेंसह पंकजा मुंडेंनाही लक्ष्य केले. राजे गेले, सेनापती गेले, सरदार गेले पण मावळे पवारसाहेबांसोबत आहेत. पक्षातून गेले ते कावळे, असे म्हणत धनंजय मुंडेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. विशेष म्हणजे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना टार्गेट करताना मुंडेंनी छत्रपती शिवरायांचा दाखला दिला.
सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस, शिवसेनेकडून मंत्रिपद मिळवलेले जयदत्त क्षीरसागर आणि उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. विनायक मेटे आणि पंकजा मुंडेंच्या वादाचाही उल्लेख धनंजय मुंडेंनी केला. विनायक मेटे महाजनादेश यात्रेच्या बसवर चढले आणि खेळ झाला. मंत्री रुसून गेल्या, असे म्हणत नाव न घेता पंकजा मुंडेंवर टीका केली. तसेच, बबनराव पाचपुते यांना अगोदर मुख्यमंत्री बनन्या म्हणायचे, आता बबनराव म्हणतात, असे म्हणत पाचपुते यांनीही खिल्ली उडवली.
आष्टीचं बेणं भाजपात गेलं असं म्हणत मुंडेंनी सुरशे धस यांना लक्ष्य केलं. तर, इथे रोजगार नव्हता म्हणून ते शिवसेनेत गेले, असे म्हणत मंत्री आणि शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टीका केली. तसेच, उदयनराजे भोसलेंनाही टार्गेट केलं. राजे गेले, सेनापती गेले, सरदार गेले, जे कावळे होते तेही गेले. पण, छत्रपतींचे मावळे आणि महाराष्ट्राची जनता तुमच्यासोबत आहे, असे म्हणत पवारांच्या पाठिशी जनता असल्याचं म्हटलं.
Breaking : धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा, शरद पवारांकडून पहिली यादी जाहीर https://t.co/FuwUGpMD0l
— Lokmat (@MiLOKMAT) September 18, 2019
छत्रपती शिवाजी महारांजांचा इतिहास वाचा, छत्रपतींना खुप त्रास झाला. आपल्याला तो इहिसात माहिती आहे. मात्र, 21 व्या शतकात जी घटना घडली, पुढे काय इतिहास लिहिला जाईल. छत्रपती अनाजीपंताला शरण गेले, असाच इतिहास भविष्यात लिहिला जाईल, असे म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर टीका केली. तसेच, छत्रपतींच्या गादीचा, महाराजांचा मी खूप आदर करतो, हेही सांगायला ते विसरले नाहीत.