- नितीन कांबळेकडा- साबलखेड-चिंचपुर रस्ता काम संथगतीने चालले असल्याने मोठ्या प्रमाणावर धुळीचा सामना करावा लागत आहे. याचा बाजारपेठेवर परिणाम झाला असून व्यापारी आणि हाॅटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. रस्ता कामाला गती मिळावी अशी मागणी करत व्यापारी, हॉटेल व्यवसायकांनी आज सकाळी ११ वाजता कडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्तारोको आंदोलन केले.
बीड - नगर राष्ट्रीय क्रमांक ५६१ हा महामार्गावरील आष्टी ते साबलखेड या १७ किलोमीटर रस्त्यासाठी कोट्यवधीच निधी मंजूर आहे. या रस्त्याचे काम अंत्यत संथगतीने सुरू आहे.याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर होत आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हाॅटेल व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर धुळीचा सामना करावा लागत असल्याने अनेक अडचणी नागरिकांना होत आहेत.
रस्त्याचे संथ काम आणि धुळीने अनेक अपघात देखील होत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. याला वैतागून नागरिक, व्यापारी आणि हाॅटेल व्यावसायिकांनी आज सकाळी बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील कडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्तारोको आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग अभियंता आर.व्ही.भोपळे,आष्टी तहसीलचे कडा येथील तलाठी जगन्नाथ राऊत यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, आंदोलकांनी महामार्ग अभियंत्याला घेराव घालत धारेवर धरले.
आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी माजी सरपंच संपत सांगळे,अनिल ढोबळे,हेमंत मेहेर,योगेश भंडारी,नागेश कर्डिले,बिपीन भंडारी, सुनिल रेडेकर, बाबूशेठ भंडारी, संजय मेहेर,धनजंय मुथ्था,दिपक गरूड, सोमनाथ गायकवाड, प्रकाश खेडकर, प्रवीण भळगट,संतोष ओव्हाळ,राजू रासकर,कालू शेख, बबन औटे, संकेत चौधरी,गणेश घोलप, विष्णू कुसळकर,सुनिल आष्टेकर, दिपक सोनवणे,संग्राम ढोबळे, निखिल ढोबळे, इब्राहिम सय्यद,रविंद्र ढोबळे,डाॅ.महादेव चौधरी,भाऊसाहेब भोजने,निलेश अनारसे, पिंटू कर्डीले,संदिप भळगट,जयंत खंदारे, दत्ता होळकर आदींचा सहभाग होता. यावेळी पोलीस निरीक्षक विजय नरवाडे,पोलीस अंमलदार नवनाथ काळे, मजरूद्दीन सय्यद, दिपक भोजे,सद्दाम शेख, संतोष आव्हाड, प्रवीण क्षीरसागर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.