संकल्प निरोगी बीड अभियानातून नागरिकांचे आरोग्य जपण्याचा स्तुत्य उपक्रम : अमरसिंह पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:09+5:302021-07-23T04:21:09+5:30

संकल्प निरोगी अभियानाचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे अमरसिंह पंडित यांच्या शुभ हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे ...

Commendable initiative to protect the health of citizens through Sankalp Nirogi Beed Abhiyan: Amarsingh Pandit | संकल्प निरोगी बीड अभियानातून नागरिकांचे आरोग्य जपण्याचा स्तुत्य उपक्रम : अमरसिंह पंडित

संकल्प निरोगी बीड अभियानातून नागरिकांचे आरोग्य जपण्याचा स्तुत्य उपक्रम : अमरसिंह पंडित

संकल्प निरोगी अभियानाचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे अमरसिंह पंडित यांच्या शुभ हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, आरोग्य विभागाचे उपसंचालक एकनाथ माले, जि. प. सभापती बाबूराव जाधव, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, जगन्नाथ शिंदे, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळेसह अनेक जण उपस्थित होते.

यावेळी अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र स्थानिक पातळीवर मिळावे. यासाठी महिन्यातून एक दिवस सदरील कमिटीने उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे भेट देऊन दिव्यांगांच्या तपासण्या करून प्रमाणपत्र देण्यात यावे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी गेवराईसह उमापूर, मादळमोही, तलवाडा, जातेगाव या आरोग्य केंद्रामध्ये रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

यावेळी आरोग्य उपसंचालक एकनाथ माले, डॉ. महादेव चिंचोले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अमरसिंह पंडित यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात एका दिव्यांगाला प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या अभियानांतर्गत रुग्णालयामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले तसेच रुग्णांना फळे वाटप केले. या संकल्प निरोगी अभियानामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गरोदर माता तपासणी व उपचार, जिभेवरील शस्त्रक्रिया, दिव्यांगांची तपासणी व प्रमाणपत्र वाटप, रक्तदान शिबिर, कोरोना समुपदेशन आदींबाबत उपचार केले जाणार आहेत. कार्यक्रमास सर्वश्री सपोनि संदीप काळे, श्याम मुळे, ऋषिकेश बेदरे, विजय वाव्हळ, मनोहर पिसाळ, शेख खाजा,जालिंदर पिसाळ, राधेशाम येवले, अक्षय पवार, दत्ता पिसाळ, विलास निकम, श्रीराम आरगडे, आनंद सुतार, भाऊसाहेब माखले, दत्ता दाभाडेंसह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. संजय कदम यांनी, तर आभार डॉ. राजेश शिंदे मानले.

220721\sakharam shinde_img-20210722-wa0022_14.jpg

Web Title: Commendable initiative to protect the health of citizens through Sankalp Nirogi Beed Abhiyan: Amarsingh Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.