बीड जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींच्या ३३२९ प्रभागांची स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:30 AM2018-10-14T00:30:40+5:302018-10-14T00:31:18+5:30
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ग्रामपंचायत स्तरावरील प्रभाग वॉर्ड स्पर्धा १५ ते २७ आॅक्टोबरदरम्यान रंगणार आहे. जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींच्या ३३२९ प्रभागांमध्ये ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या तपासणी समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक ग्रामपंचायत निहाय १०३१ समित्या स्थापन केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ग्रामपंचायत स्तरावरील प्रभाग वॉर्ड स्पर्धा १५ ते २७ आॅक्टोबरदरम्यान रंगणार आहे. जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींच्या ३३२९ प्रभागांमध्ये ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या तपासणी समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक ग्रामपंचायत निहाय १०३१ समित्या स्थापन केल्या आहेत.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या तपासणी दरम्यान सुंदर चांगल्या वॉर्डाची घोषणा होणार आहे. या स्पर्धेत प्रथम येणाºया वार्डसाठी दहा हजार रुपये पारितोषिक शासनाकडून देण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्हा परिषद गटात पालक अधिकारी यांना तपासणी समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहेत. तर ग्रामसभा संपर्क अधिकारी यांना प्रत्येक ग्रामपंचायतींचे सदस्य सचिव म्हणून काम पहावयाचे आह. जिल्ह्यात साठ जिल्हा परिषद गटात साठ तपासणी समिती अध्यक्ष नियुक्ती केले असून ३३२९ ग्रामसभा संपर्कअधिकारी सदस्य सचिव म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत.
समितीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समिती, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, रोजगार सेवक, ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक, पाणीपुरवठा कर्मचारी, बचत गटाचे अध्यक्ष, स्वच्छाग्रही हे त्यांच्या गावातील ग्रामस्थ तपासणी समितीचे सदस्य असणार आहेत. या समितीच्या मदतीने गावातील प्रभागाची तपासणीचा उपक्रम सुरू करणार असून या संदर्भात सर्व पंचायत समिती अंतर्गत कार्यशाळा पार पडली आहे.
सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी ही स्पर्धा होणार असल्याने ग्रामस्थांनी पाणीपट्टी वसुली, शौचालय व वापर, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, तसेच लोकसहभागातील कामे याबाबत पुढाकार घेऊन तपासणी समितीस सहकार्य करावे व प्रभागाच्या प्रमुखांनी सदर समितीसमोर आपल्या प्रभागाचे सादरीकरण करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी केले आहे.
प्रभागाला १० हजाराचे बक्षीस
प्रथम आलेल्या प्रभागासाठी दहा हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार असून सदर पारितोषिकाची रक्कम त्याच प्रभागासाठी खर्च होणार आहे . जिल्ह्यासाठी एकूण दहा लक्ष तीस हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.