------
दोन वर्षांपासून जिल्हा व तालुका स्तरावरून शेततळे, विहीर, गायगोठे, पांदण रस्ते किंवा रोहयोच्या कोणत्याच कामाला मंजुरी दिलेली नाही. शेतकऱ्यांना व मजुरांना अशा रोजगाराच्या कामांची सध्या गरज आहे. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्व कामे ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर अडचणीत आहेत.
- अविनाश गोंडे, सरपंच, मोठेवाडी, ता. माजलगाव.
--------
दोन- तीन महिन्यांपासून कामे बंद आहेत. उन्हाळ्यात कामांची गरज होती. मागणी करूनही काम उपलब्ध झाले नाही. त्यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. - प्रमिला सिरसट, मजूर, आरणवाडी, ता. धारूर.
------------
उन्हाळ्यात शेतीकामे बंद होती, तर कोरोना लॉकडाऊनमुळे इतर मजुरीची कामे बंद होती. त्यामुळे रोहयो कामांची गरज होती. मात्र, तेही काम मिळालेले नाही. - कालिदास मस्के, मजूर, आरणवाडी, ता. धारूर.
-----------