बीड : बीड, अंबाजोगाई, केज, आष्टी, माजलगाव, गेवराई, परळी येथून कोरोना संशयित ४१ जणांचे स्वॅब गुरुवारी पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार ५ अहवाल पॉझिटिव्ह तर ३६ अहवाल निगेटिव्ह आले.
पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील ३ , पाटोदा शहरातील १ व धारुर येथील एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ६१ झाली. यापैकी तीन रुग्ण कोरोना मुक्त झाले तर एक मयत आहे. सहा रुग्णांवर पुण्यात उपचार सुरु आहेत.