रस्ता रुंदीकरणाचे मागणी
पाटोदा : पाटोदा-बीड रस्त्यावर पाटोदा येथून बीड रोडकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, तसेच हा रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीस नेहमी अडथळा येतो. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. तरी या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
...
मोठ्या पावसाची अपेक्षा
पाटोदा : नायगाव ते सौताडा दरम्यान अजून मोठा पाऊस झाला नाही. खरिपाच्या पेरण्यानंतर या परिसरात भीज पाऊस झाला आहे; परंतु तोही कमी प्रमाणात आहे. नदी, नाले वाहते होण्यासाठी व तळे, बंधारे भरण्यासाठी मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
...
बँकांमध्ये गर्दी वाढली
आष्टी : तालुक्यातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सध्या पीक कर्ज वाटप सुरू आहे. त्यातच पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. याशिवाय पीएम किसानचे अनुदान बँकेत जमा झाले आहे. त्यासाठी बँकांमध्ये गर्दी वाढली आहे.
...
रानडुकरांचा उपद्रव
कडा : परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी शेतक-यांच्या शेतातील पिके ही रानडुकरे फस्त करीत आहेत. तरी अनेक शेतक-यांचे ठिबक सिंचन तोडून टाकीत आहेत. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तरी रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
...