बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरून तो अद्याप मिळालेला नाही. त्यासाठी माजलगाव मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.निवेदनावर कॉ. सुभाष डाके, कॉ. मोहन जाधव, कॉ. दत्ता काडे, अॅड. याकूब, कॉ. सादेक पठाण, कॉ. संदीपान तेलगडे व तालुका सचिव कॉ. मुसद्दीक बाबा यांच्या स्वाक्षºया आहेत.अशा आहेत आंदोलकांच्या विविध मागण्याखरीप हंगाम २०१८ मध्ये जिल्ह्यातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतक-यांना पीक विमा संरक्षित रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करा, ओव्हर इन्शुरन्स यादीत नाव समाविष्ट केलेल्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड व दिंद्रूड महसूल मंडळातील शेतकºयांना सोयाबीन पिकाचा २०१८ चा विमा द्या.२०१८ खरीप हंगामात पावती मिळूनही अनपेड यादीत नाव असलेल्या शेतकºयांचे प्रीमियम पुन्हा जमा करून घेण्यासाठी पोर्टल खुले करून विमा हप्ता जमा करून घेण्याचे आदेश विमा कंपनीला द्या.खाते नंबर चुकलेल्या शेतकºयांचे आधार बेस पेमेंट करा, विमा प्रस्ताव आॅनलाईन दाखल करताना शिवार, गट नंबर चुकलेल्या शेतकºयांच्या सातबारा व इतर अपलोड दस्तऐवजाप्रमाणे दुरुस्त्या करून त्यांना विमा दावा रक्कम द्या, संपूर्ण कर्जमाफी करून शेतक-यांना नवीन कर्ज वाटप करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
पीकविम्यासाठी माकपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:08 AM
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरून तो अद्याप मिळालेला नाही. त्यासाठी माजलगाव मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
ठळक मुद्देघोषणाबाजी : शेतकऱ्यांचे हाल थांबविण्याची मागणी