अंबाजोगाई : येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्यावतीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी शुद्ध, थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
या कार्यक्रमाचे उदघाटन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी डॉ.सिद्धेश्वर बिराजदार होते.
यावेळी डॉ.राकेश जाधव, डॉ.नागेश अब्दागिरे, रोटरीचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण देशपांडे, सूर्यकांत महाजन, संतोष पवार, दीपक कर्णावट, तानाजी देशमुख, सारंग पुजारी, ‘रोटरी’चे अध्यक्ष डॉ.निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे, प्रकल्प समन्वयक धनराज सोळंकी, प्रदीप झरकर,मोईन शेख, गणेश राऊत यांची उपस्थिती होती.
रोटरी क्लबच्या वतीने बसविण्यात आलेल्या या जलकुंभातून दररोज एक हजार लिटर तर ताशी दोनशे लिटर याप्रमाणे शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. या प्रकल्पामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय दूर झाली आहे.
यावेळी डॉ.शंकर धपाटे, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.राकेश जाधव, सूर्यकांत महाजन, प्रवीण देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत वृक्षभेट देऊन करण्यात आले. प्रास्ताविक धनराज सोळंकी यांनी केले. संचलन संतोष मोहिते पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदीप झरकर यांनी मानले. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य दामोदर थोरात, अरुण असरडोहकर, सुहास काटे, जगदीश जाजू, पद्माकर सेलमुकर, गोरख मुंडे, आनंद कर्णावट, स्वप्नील परदेशी, ललित बजाज, नरसिंग दरगड, मोईन शेख, सचिन बेंबडे, डॉ.अनिल केंद्रे, राधेश्याम लोहिया, गोपाळ पारीख यांच्यासह ‘रोटरी’चे सदस्य उपस्थित होते.
===Photopath===
290621\1349img-20210628-wa0112_14.jpg