आष्टी : आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यांतील शेतकऱ्यांचे प्रलंबित खरीप पीक कर्ज व कर्जमाफीतील शेतकऱ्यांना कर्ज तातडीने लाभ द्यावा, अशी मागणी माजी आ. भीमराव धोंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यांतील कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनी बँकेकडे अनेक दिवसांपासून पीक कर्जाचे प्रस्ताव सादर केले आहेत. जानेवारीअखेरपर्यंत कर्ज प्रकरणे मंजूर झालेले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी बँकेत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे व अरेरावीची भाषा केली जाते. तसेच कर्जमाफीतील शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज दिले गेलेले नाही, त्यांना पण कर्ज द्यावे. तरी प्रलंबित खरीप पीक कर्ज व कर्जमाफीतील शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे बँकांना आदेश करण्यात यावे, असे माजी आ. धोंडे यांनी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.