उघड्यावर विक्री होणाऱ्या फळांची तपासणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:21+5:302021-07-01T04:23:21+5:30
कार्बाईडने पिकविलेली फळे आरोग्यास अपायकारक असल्याने नियमानुसार अशी फळे विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे ...
कार्बाईडने पिकविलेली फळे आरोग्यास अपायकारक असल्याने नियमानुसार अशी फळे विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. अंबाजोगाई व परिसरात कार्बाईडने पिकविलेली फळे बाजारात आली आहेत. विशेष करून स्वस्त फळ म्हणून केळीचे सेवन केले जाते. मात्र केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर केला जातो. हे एक प्रकारचे विष आहे. याचे अतिशय घातक परिणाम शरीरावर दिसून येतात. त्यामुळे फळांबरोबरच बालकांना विषाचेही सेवन करावे लागत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने सदर फळांची बाजारपेठेत खुलेआम विक्री केली जात आहे. या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांनी केली आहे.