धारूर घाटात धोकादायक वळणाच्या ठिकाणी मालवाहू ट्रकचा पुन्हा तिहेरी अपघात दोन तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 07:53 PM2018-12-06T19:53:25+5:302018-12-06T19:54:21+5:30
या अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती.
धारूर (बीड ) : येथील घाटामध्ये अरूंद व धोकादायक वळणाच्या ठिकाणी मालवाहू ट्रकचा अपघात होण्याची मालिकाच सुरू आहे . बुधवारी साखरेच्या ट्रकचा अपघात झाल्यानंतर पुन्हा मालवाहू ट्रकचा तिहेरी अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती.
घाटात वळणाच्या ठिकाणी ब्रेक फेल होणे व अरूंद ठिकाण असल्यामुळे मागील चार महिन्यापासून अपघातांची मालिका सुरू आहे. या अपघातामध्ये मालवाहू गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. सोमवारी रात्री येडेश्वरी कारखान्यावरून साखरे ने भरलेला ट्रक तेलगाव कडे जात असताना धोकादायक वळणाच्या ठिकाणी ब्रेक फेल होऊन पलटी झाला होता पुन्हा बुधवारी दुपारी अरुंद व धोकादायक वळणामुळे धारूर येथील घाटात साखरेचाच ट्रक खडुयात जाऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतांनाच गुरुवारी सकाळी म्हसोबा मंदीराजवळ वळणाच्या ठिकाणी गुरुवारी सकाळी तिन मालवाहू ट्रकच एकाच वेळी अपघात झाला.
यात कर्नाटकहून माजलगावकडे एक ट्रक बाजरी ( के.ए.२८, ए-६५०० ) जात होता. या वेळी तेल गावकडून तामीळनाडू कडे नॉयलॉन दोर घेवून जाणाऱ्या टी .एन.७४ , आर- ३७४६ ची समोरासमोर धडक झाली . या वेळी सांगलीहून परभणीकडे कुकूट खाद्य घेवून जाणाऱ्या एम .एच.२०, ए .टी -८८३२ ट्रकला बाजरी घेवून जाणाऱ्या ट्रकची बाजूने धडक झाली . यात दोन ट्रकचे समोरील भागाचे नुकसान झाले.
या आपघाता मुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली होती.मोठी वाहणे हा रस्ता बंद झाल्याने जहागीरमोहा मार्गे न्यावी लागली.ग्रामीण भागातील जे विद्यिर्थी धारूर येथे शाळा महिविद्यालयास येतात त्याःना दोन ते तिन कि.मी.पायपीट करत यावे लागले .हा रस्ता अंरूद असल्याने अपघाताचा सापळाच हा रस्ता झाला आहे.