बीड : पेट्रोल पंपावर उभा असणाऱ्या टँकरमधील डीझेल चोरणारी टोळी वडवणी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. ही कारवाई बुधवार व गुरूवारी मध्यरात्री करण्यात आली. यामध्ये एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.गणेश बाळासाहेब घुगे (वय २४), अजय सुभाष घुगे (वय २४) अमोल व्यकंटी लोमटे (वय २५),प्रशांत व्यंकटी कांबळे (वय १९ रा. सर्व होळ ता. केज) आणि गोविंद गिरदारी चव्हाण( वय २०), कमल देवसिंह पलाही (वय ३०), दीपक विष्णू सोळंकी, (वय २५) ,धर्मेंद्र शिवालाल डोरिया (वय २५), भैरवलाल गब्बूजीलाल डोरिया (वय २५ रा. सर्व मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. वडवणी शहरात गुरूवारी अमोल आंधळे यांच्या ओंकार पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या विविध गाड्यांच्या टाकीमधील डिजेल पाईपद्वारे काढुन चोरट्यांकडे असलेल्या दोन जीपमध्ये (क्रमांक,एम एच २२, एच०००७ व एम एच ४४, जी३ ०३२९) कँडमध्ये घेऊन जात होते.ही बाब पंपमालक अमोल आंधळे यांच्या लक्षात आली. त्यानी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ पंपाकडे धाव घेत शोधमोहिम सुरु केली. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास या डिझेलचोरांना दोन किमी पाठलाग करुन शहराजवळील गजानन जिंनिंग जवळ शिताफीने पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात वडवणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, उपअधीक्षक श्रीकांत डीसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश खाडे, पोउपनि पवनकुमार अंधारे, मनोज जोगदंड, संजय राठोड, राम बारगजे, चालक गर्जे, चंद्रसेन माळी यांनी केली.नदीने केला तीन किमी पाठलागसुरूवातीला होळ येथील चोरटे ताब्यात घेतले. त्यांच्या माहितीवरून मध्यप्रदेशचे चोरटे अंबाजोगाई तालुक्यात असल्याची माहिती मिळाली. पोउपनि पवनकुमार अंधारे यांचे पथक तपासासाठी गेले. एका नदीत हे चोरटे लपले होते. पहाटेच्या सुमारास तब्बल तीन किमी पाठलाग करून अंधारे व चमूने त्यांना सिनेस्टाईल पद्धतीने पकडले. यामध्ये अंधारे किरकोळ जखमी झाल्याचे समजते.
डिझेल चोरणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:21 AM
पेट्रोल पंपावर उभा असणाऱ्या टँकरमधील डीझेल चोरणारी टोळी वडवणी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. ही कारवाई बुधवार व गुरूवारी मध्यरात्री करण्यात आली. यामध्ये एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठळक मुद्देवडवणी पोलिसांची कामगिरी : ९ आरोपींना बेड्या, तीन दिवसांची पोलीस कोठडी