अंबाजोगाई : येथील अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या झालेल्या चौकशीत अनेक गैरप्रकार व अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई झाली. बीड जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांच्या आदेशाने झालेल्या या कारवाईमुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.अंबाजोगाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. सन २०१५ मध्ये आलेल्या संचालक मंडळाने मनमानी कारभार व वाढते गैरप्रकार यामुळे बाजार समिती चर्चेचा विषय ठरली. समितीच्या गैर कारभारासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर परदेशी यांनी सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडे विविध पुराव्यांसह तक्रार दाखल केली. बाजार समितीने रस्त्याची कामे अर्धवट केली, शेतकऱ्यांसाठी न बसवलेला वजनकाटा, बाजार समितीच्या जागेवर अतिक्रमण करून पक्की घरे बांधणे, ती घरे गैर मागार्ने भाड्याने देणे, दुसºयाच्या जागेत व्यवसाय करणे, चुकीचे प्लॉट वाटप व चुकीच्या पद्धतीने केलेले गाळ्यांचे वाटप अशा अनेक बाबींचा समावेश तक्रारीत करण्यात आला होता.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांनी या तक्रारीची दखल घेऊन त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीने स्थळ पाहणी करून आपला अहवाल पणन संचालक यांच्याकडे दिला.बाजार समितीच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभाराचे व अनियमिततेचे कारण पुढे करून जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले व अंबाजोगाई येथील सहा. निबंधक विष्णू पोतंगले यांची प्रशासक म्हणून सहा महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्ती केली.चार वषार्पूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत १८ संचालकांच्या जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनल ने मोठ्या फरकाने जागा जिंकल्या. त्यामुळे ही बाजार समिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात राहिली. गेल्या १५ वर्षांपासून बाजार समितीमधील प्लॉट आणि गाळेवाटप हा वाद वषार्नुवर्षे सुरूच आहे. या संचालक मंडळाच्या कार्यकाळातही हाच मुद्दा कळीचा ठरला.सहा महिन्याच्या कालावधीत बाजार समितीचा बिघडलेला कारभार प्रशासक कितपत सुरळीत करतात याकडे लक्ष लागले आहे.उच्च न्यायालयात दादबाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश बीड जिल्हा उपनिबंधक यांनी दिले आहेत.या आदेशाच्या विरुद्ध संचालक मंडळाने औरंगाबाद येथे उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.या संदभार्तील निर्णय स्थगिती आदेश लवकरच प्राप्त होईल अशी माहिती बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे यांनी दिली.
अंबाजोगाई बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:12 AM
येथील अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या झालेल्या चौकशीत अनेक गैरप्रकार व अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई झाली.
ठळक मुद्देचौकशी अहवालातून झाली बरखास्ती : प्रशासकपदी जिल्हा उप निबंधकांची नियुक्ती; प्लॉट व गाळे वाटपात अनियमितता