बीड : जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागाने उपाययोजना केल्या जात आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन त्यादृष्टीने तयारी करत आहोत. आपला जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वावलंबी व्हावा, यासाठी ११ तालुक्यांत ११ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असून, यापैकी ४ प्लांटचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी बीड पोलीस दल पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. समारंभास बीडचे आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा ीअधीक्षक आर. राजा, जि. प. सीईओ अजित कुंभार यांच्यासह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, डॉक्टर आदी निमंत्रित उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बीडचे सहायक पोलीस निरिक्षक सूर्यकांत तुकाराम गुळभिले यांचा राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना काळातील कार्याबद्दल स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, स्व. केशरताई सोनाजीराव क्षीरसागर आणि कृष्णा रुग्णालयांच्या कामाचा प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर वृत्तपत्र भूसंपादन जाहिरातींची थकित देयके देण्यासाठी कार्यवाहीसाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संपादक व पत्रकारांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा करताना सांगितले.
160821\img-20210815-wa0147_14.jpg~160821\img-20210815-wa0146_14.jpg