बातमी व फोटो कोरोनाला घाबरू नका ; आरोग्याची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:18+5:302020-12-31T04:32:18+5:30
कोरोनाच्या संकट काळात घाबरून न जाता सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन देशमुख यांनी केले. यावेळी उद्घाटक म्हणून ...
कोरोनाच्या संकट काळात घाबरून न जाता सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन देशमुख यांनी केले.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की, संकटकाळात एकमेकांना सहकार्य करा कारण, कोरोना काळात लॉकडाऊनच्या २० मार्च २०२० पासून महाराष्ट्र राज्य सरकारने परिस्थिती अतिशय चांगल्याप्रकारे हाताळली आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी शासन निर्देशानुसार सतर्क रहावे, गर्दीत न जाता सुरक्षित अंतर ठेवावे,मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाला घाबरून न जाता माणसाने स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे, संचालक अजयराव पाटील, कार्यकारी संचालक सुरेश साखरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब लोमटे, वसुदेव शिंदे, सोमवंशी, काकासाहेब किर्दंत, प्राथमिक आयुर्वेदिक केंद्र बर्दापुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल हडबे, आरोग्य अधिकारी डॉ.आशा मारवले, वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.डी.फड, डॉ. सय्यद इम्रान अली, तालुका पर्यवेक्षक वाय.पी.मस्के, आर.के.जाधव, पर्यवेक्षक एल.डी.तपसे, ए. एस .सोनवणे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख समी यांनी करून उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.बाळासाहेब लोमटे यांनी मानले.
या शिबिरात अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे कामगार, हंगामी ऊस तोडणी मजूर, वाहतूक मजूर, मुकादम आणि ठेकेदार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला. बहुसंख्येने लोक उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.आशा मारवले (वाघाळा), डॉ.किरण लोंढे (राडी), डॉ.धनेश्वर मेनकुदळे (सुगाव), डॉ.शेख अब्दुल (हातोला), डॉ.प्रांजली किर्दंत (भारज), डॉ.सुवर्णा सर्वज्ञ (जवळगाव) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, बर्दापूर येथील कर्मचारी व अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.