लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे. काही भागात अद्याप पेरणीच झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत, तर तालुक्यातील काही भागात बºयापैकी पाऊस असल्याने येथील परिस्थिती बरी आहे. कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.गेवराई तालुक्यातील शेतकरी गतवर्षी पावसाची अवकृपा, गारपीट, बोंडअळीने त्रस्त होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच मंजूर असलेल्या पीकविम्या यादीत अनेकांचे नावच नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. पीककर्जाचे वाटपही संथगतीने सुरु आहे. त्यातच पावसानेही ओढ दिल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.तालुक्यातील सिरसदेवी, गढी, तळेवाडी, शिंदेवाडी, रांजणीसह परिसरात सोयाबीनबरोबरच अन्य पिकांच्या पेरण्या अद्याप बाकी आहेत. पाचेगाव, मादळमोहीसह परिसरात बºयापैकी पाऊस असल्याने पीक परिस्थिती चांगली आहे. उर्वरित भागात कपाशी, सोयाबीन, तूरसह अन्य पिकांची लागवड होऊनही पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे.हवामान खात्याचे अंदाजही खोटे ठरत असल्याने समाधानकारक पाऊस केव्हा पडेल अशी विचारणा शेतकºयांमधून होत आहे. पावसाअभावी पिकाची स्थिती नाजूक झाल्यामुळे काही शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देत आहेत. मात्र, कोरडवाहू शेतकºयांची मात्र मोठी पंचायत झाली आहे.सद्यस्थितीला पंढरपूर वारीसाठी अनेक दिंड्यांचे प्रस्थान होत आहे. पावसाअभावी तसेच पीकविमा - पीककर्ज मिळाले नसल्याने दिंडीत सहभागी होणाºया भविकांची संख्या कमी झाली आहे. अनुदानित सोयाबीन शेतकºयांना दुकानदाराकडून मिळत नसून कृषी विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. याबाबतही शेतकºयांच्या अनेक तक्रारी आहेत. याकडे संबंधित अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यात आतापर्यंत ८६.१ मिमी पाऊस नोंदला आहे. मागील वर्षी ५ जुलैपर्यंत ११९.३ मिमी पाऊस झाला होता. काही भागात पावसाने साथ दिली असलीतरी काही भागात मात्र शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.दुबार पेरणीसाठी अनुदान द्यातालुक्यात पावसाने दडी मारल्याने उगवलेले पीक जळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावासाने हजेरी लावली तरीही पिकांची उगवण होणार नाही. त्यामुळे दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने दुबार पेरणीसाठी अनुदान देण्याची मागणी गढी येथील शेतकरी शिवाजी संतराम ससाणे यांनी केली.तीव्र उन्हाने चिंता वाढलीसध्या तालुक्यात उन्हाची तीव्रता जाणवत आहे. पिके सुकू लागली असून, जनावरांच्या चाºयासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकरी हैराण झाले असल्याचे किनगाव येथील शेतकरी तुकाराम चाळक यांनी सांगितले.
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:54 AM
तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देकहीं खुशी कहीं गम : गेवराई तालुक्यामध्ये काही भागात पेरणीच नाही तर काही ठिकाणी ब-यापैकी स्थिती