कोरोनाकाळात निराधार झालेल्या ७०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:34+5:302021-06-19T04:22:34+5:30

अंबाजोगाई : कोरोनाच्या संसर्ग काळात अनाथ झालेल्या ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलण्याचा संकल्प भारतीय जैन संघटनेने केला आहे. ...

Educational adoption will be given to 700 students who became destitute during the Corona period | कोरोनाकाळात निराधार झालेल्या ७०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेणार

कोरोनाकाळात निराधार झालेल्या ७०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेणार

Next

अंबाजोगाई : कोरोनाच्या संसर्ग काळात अनाथ झालेल्या ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलण्याचा संकल्प भारतीय जैन संघटनेने केला आहे. त्यादृष्टीने आई अथवा वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष धनराज सोळंकी यांनी दिली.

कोरोनाच्या संसर्गकाळात अनेक कुटुंबीयांवर मोठे आघात झाले. काही जण कोरोनामधून सुखरूप बाहेर पडले; परंतु काही जणांना मात्र आप्तस्वकीयांना गमवावे लागले. कोरोनामुळे आई किंवा वडिलांचे निधन झाल्याने अनेक बालके अनाथ झाली. त्यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच आधाराची गरज आहे. कुटुंबात निर्माण झालेल्या संकटामुळे हे विद्यार्थी सध्या मानसिक तणावाखाली आहेत. या तणावातून बाहेर काढून समाजाच्या प्रवाहात आणून आत्मविश्वास वाढवत त्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय जैन संघटना प्रयत्न करणार आहे. या विद्यार्थ्यांना पुणे येथे निवास, भोजन तसेच शैक्षणिक सुविधा संघटनेच्या वतीने उपलब्ध केली जाणार असल्याचे धनराज सोळंकी यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय पदाधिकारी करणार यादी

याअंतर्गत संघटनेचे पदाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्या जिल्ह्यातील कोविडमुळे आई किंवा वडील अथवा आई आणि वडील असे दोन्ही छत्र हरपलेल्या पाचवी ते बारावीपर्यंत मराठी माध्यमाचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणार आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याची संमती पालकांकडून घेतली जाणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची याबाबत परवानगी घेतली जाईल.

तीस वर्षांपासून कार्य

भारतीय जैन संघटना भागील ३० वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या क्षेत्रात कार्य करीत आहे. मार्च २०२० पासून मोबाइल डिस्पेंसरी सेवा, मिशन झिरो प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजना, रक्तदान चळवळ, सेरो सव्हॅलन्स, कोविड केअर सेंटर, मिशन लसीकरण, मिशन ऑक्सिजन बँक आदी उपक्रम संघटनेने राबविले आहेत.

यापूर्वी भारतीय जैन संघटनेने लातूर भूकंपातील १२००, मेळघाट व ठाण्यातील १ हजार १०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० मुले अशा ३ हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचे काम केले आहे.

Web Title: Educational adoption will be given to 700 students who became destitute during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.