बीडमध्ये बंद पडलेल्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:33 PM2018-05-16T23:33:20+5:302018-05-16T23:33:20+5:30

आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत दोन फेऱ्यांमध्ये जिल्ह्यात जवळपास १३०० प्रवेश पूर्ण झाले आहेत. दरम्यान या योजनेंतर्गत आॅनलाईन नोंदणी केलेल्या १५ ते २० विद्यार्थ्यांचा ज्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाला, त्या शाळाच बंद झाल्याचे कळल्यानंतर पालक आणि शिक्षण विभागापुढे पेच निर्माण झाला आहे.

Entry into the closed English schools in Beed! | बीडमध्ये बंद पडलेल्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश !

बीडमध्ये बंद पडलेल्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश !

googlenewsNext
ठळक मुद्दे२० मुलांच्या प्रवेशाचा पेच : शिक्षण विभागाने संचालकांना प्रस्ताव पाठविला

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत दोन फेऱ्यांमध्ये जिल्ह्यात जवळपास १३०० प्रवेश पूर्ण झाले आहेत. दरम्यान या योजनेंतर्गत आॅनलाईन नोंदणी केलेल्या १५ ते २० विद्यार्थ्यांचा ज्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाला, त्या शाळाच बंद झाल्याचे कळल्यानंतर पालक आणि शिक्षण विभागापुढे पेच निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंद झालेल्या परंतु आरटीई प्रवेशासाठी पोर्टलवर दिसणा-या जिल्ह्यातील दोन इंग्रजी शाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. बंद अथवा स्थलांतरित झालेल्या शाळांचा आकडा वाढू शकतो.

आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशासाठी राज्यभरात प्रक्रिया सुरु झाली. या योजनेनुसार बीड जिल्ह्यात २०० इंग्रजी शाळांमधून २७०८ प्रवेश द्यावयाचे आहेत. आॅनलाईन सोडत काढण्यात आली. निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा अथवा टाळाटाळ केल्यास कारवाईचा बडगा उगारावा लागला. त्यामुळे जिल्ह्यात दोन फेºया व प्रवेश सुरळीत झाले. यात पहिल्या फेरीत ९५० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर दुसºया फेरीत जवळपास ३०० प्रवेश निश्चित झाले. १३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रवेश निश्चित झालेल्या शाळा बंद असल्याबद्दल पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर वस्तुस्थिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे तसेच आरटीई २५ टक्के प्रवेश योजनेचे समन्वयक ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गौतम चोपडे यांनी सांगितले. प्रवेशासाठीची तिसरी फेरी सुरु होण्याआधी यावर निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे.

एसएमएस मिळाले, पण शाळा बंद
मशिप्रची ग्लोबल इंग्लिश स्कूल व गेवराईची अनुपमा इंग्लिश स्कूल आॅनलाईन नोंदणी करताना दिसून आल्याने पालकांनी या शाळांना प्राधान्य दिले होते. या दोन शाळांना प्राधान्य देणाºया विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे एसएमएस पालकांना मिळाले. प्रवेशासाठी गेल्यानंतर या शाळाच बंद असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे जवळपास २० विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शाळा प्रवेशाबाबत पेच निर्माण झाला आहे.

प्रवेश निर्णयाची प्रतीक्षा
संबंधित दोन शाळा बंद आहेत. पहिल्या फेरीत प्रवेश दिलेल्या या विद्यार्थ्यांना निकषानुसार येणाºया पुढील फेरीतील शाळांमध्ये प्रवेश देण्यात यावा असे शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांना कळविले आहे.

Web Title: Entry into the closed English schools in Beed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.