बनावट लग्न करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 01:32 PM2021-03-14T13:32:58+5:302021-03-14T13:33:17+5:30

आष्टी पोलीसांनी दोघांना घेतले ताब्यात, गुन्हा दाखल

Exposing gangs who cheat young people by having fake marriages | बनावट लग्न करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बनावट लग्न करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलेने एक दोन नव्हे तर तब्बल ८ जणांशी केला बनावट विवाह

- अविनाश कदम
आष्टी : तरुणांसोबत बनावट विवाह करून चारआठ दिवस राहून पैसे उखळणा-या टोळीचा आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तालुक्यातील शिराळ येथील तरुणासोबत दि.९ रोजी विवाह करुन एका महिलेने २ लाख रुपये दे अन्यथा मला फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी मागणी करताच तरुणाने पोलिसात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करताना रंगेनाथ पकडून टोळीचा पर्दाफाश केला आहे.  प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज आहे. 

तालुक्यातील शिराळ येथील एका युवकाने पोलीस ठाणे आष्टी येथे तक्रार दिली की, दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचे एका महीले सोबत लग्न झाले असून आत्ता ती महीला पैश्याची मागणी करीत असून पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे. यानंतर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सदर तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचून कारवाई केली. यावेळी एक महीला व पुरुष यांनी तक्रारदार युवक याचेकडून मागणी केल्याप्रमाणे रोख रक्कम ५० हजार रुपये शासकिय पंचासमक्ष स्विकारली. सदर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी यापुर्वी सात ते आठ युवकांसोबत लग्न लावुन त्यांना खोटया तक्रारी धमक्या देवुन त्यांचे कडुन पैसे उकळले असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांचे जबाबा वरुन पोलीस ठाणे आष्टी गु.र.न 69/2021 कलम 384,388,389,420,34 भा.द.वी प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असुन अधिक तपास कामी पोलीस कोठडी कामी मा.न्यायालयात हजर करुन  अधिक तपास करीत आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक आर राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार,उपविभागीय पोलीस अधीकारी विजय लगारे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोउपनि प्रमोद काळे, सफौ अरुण कांबळे ,पोह बन्सी जायभाये, संतोष क्षीरसागर, पोशि प्रदिप पिंपळे,सचिन कोळेकर , स्वाती मुंडे, शिवप्रकाश तवले,रियाज पठाण यांनी केली 

लग्नाचे आमिष दाखवणा-या टोळीला बळी पडू नये 
वय जास्त झालेल्या तरुणांना संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून ही टोळी आमच्याकडे मुलगी आहे.असे सांगून स्थळ दाखवले जाते व लग्नासाठी पैशाची मागणी करुन वारंवार खंडणी वसूल केली जाते या टोळीपासून तरुणांनी सावध रहावे व अशी फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क करावा 
- सलिम चाऊस, पोलिस निरीक्षक

Web Title: Exposing gangs who cheat young people by having fake marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.