ग्रामपंचायतच्या आखाड्यात कुटुंब कलह; चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्यांनी फाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 06:31 PM2020-12-30T18:31:01+5:302020-12-30T18:32:32+5:30

Gram Panchayat Election अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती

Family feud in Gram Panchayat arena; The cousin's candidature application was torn by his nephews | ग्रामपंचायतच्या आखाड्यात कुटुंब कलह; चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्यांनी फाडला

ग्रामपंचायतच्या आखाड्यात कुटुंब कलह; चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्यांनी फाडला

googlenewsNext
ठळक मुद्देअर्ज दाखल करणार्‍या सर्वच उमेदवारांची दिवसभर पळापळ चालू होती.धक्का-बुक्की करत हातातील अर्ज हिसकावून घेतला.

माजलगाव :  तालुक्यातील दिंद्रुड येथील ग्रांपचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी काही वेळ बाकी असतांना कुटुंब कलहातून वेगळेच नाट्य रंगले. तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या चुलत्याचा अर्ज हातातून हिसकावून घेत पुतण्याने पळ काढत तो फाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४. ३० वाजेदरम्यान घडली.

तालुक्यात पहिल्या टप्यात पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने बुधवार ( दि.३० ) रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यातच ऑनलाईन अर्ज दाखल करतांना सर्व्हर डाऊन होत असल्याने निवडणूक विभागाने ऑफलाईन अर्ज स्विकारले. त्यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ वाढवून दिला होता. अर्ज दाखल करणार्‍या सर्वच उमेदवारांची दिवसभर पळापळ चालू होती. याच दरम्यान, सायंकाळी ४.३०  वाजता तहसिल कार्यालय आवारात दिंद्रुड ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अशोक हरिनाथ कोमटवार हे आले. यावेळी त्याठिकाणी त्यांचे पुतणे अक्षय दिलीप कोमटवार, अजय दिलीप कोमटवार, अमित दिलीप कोमटवार यांनी अशोक कोमटवार यांना धक्का-बुक्की करत हातातील अर्ज हिसकावून घेतला. यानंतर तेथून पळ काढत त्यांनी अशोक कोमटवार व त्यांचा मुलगा निखिल अशोक कोमटवार यांचा उमेदवारी अर्ज फाडून टाकला. यामुळे तहसिल कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. यानंतर अशोक कोमटवार यांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. परत पुन्हा कागदपत्राची जमवा-जमव करत अर्ज भरला.  यावेळी त्यांना चांगलाच घाम फुटला होता. शेवटी त्यांनी वेळेत अर्ज दाखल केला.

पोलीसांची बघ्याची भुमिका, तर तहसिलदारांचे कानावर हात
अर्ज फाडण्याची घटना होत असतांना समोरच उभा असलेल्या पोलीसांना अशोक कोमटवार बचावासाठी आवाज देत होते. मात्र, त्यावेळी उपस्थित पोलीसांनी याकडे डोळेझाक करून एक प्रकारे या घटनेला पाठबळ देण्याचे काम केले. तर तहसिलदार वैशाली पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी हा प्रकार तहसिल कार्यालयात झाला नसून तो बाहेर झाला असल्याचे सांगत कानावर हात ठेवले.

Web Title: Family feud in Gram Panchayat arena; The cousin's candidature application was torn by his nephews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.