परळी : शहरातील मिलिंद नगर, जुने रेल्वे स्टेशन भागातील नागरिकांनी सोमवारपासून पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.उपोषणार्थी शेख अफसर म्हणाले, परळी नगरपरिषदकडे पिण्याच्या पाण्याची सोय करावी यासंदर्भात अनेकवेळा पत्र देऊन पाठपुरावा केला. तरीही पाणीपुरवठा विभागाने दखल घेतली नाही, मिलिंद नगर व जुना रेल्वे स्टेशन भागात अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. या भागातील काही नागरिक पाण्याविना त्रस्त झाले आहेत. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नगर परिषदेसमोर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत आहे, असे सांगितले. निवेदनावर जाकेरसय्यद, शेख अफसर, शेख इमाम, अरुण सरवदे, अमोल नाईकवाडे, शेख अनिस, अब्दुल काकर, असलम शेख, अफजल पठाण इब्राहिमा, जावेद यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत. त्यानंतर आज या नागरिकांनी उपोषण केले. यात भाजपचे कार्यकर्ते दत्तात्रय कुलकर्णी यांनीही उपोषणात सहभाग नोंदविला.
परळी नगर परिषदेसमोर पाण्यासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:36 AM