याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रांतपाल अनुराधा चांडक म्हणाल्या, गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद हाच जीवनातील खरा आनंद असतो. क्लबच्या माध्यमातून गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचता येते.
व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्षा अंजली चरखा, सचिव मेघना मोहिते, अर्चना मुंदडा, शिवकन्या पवार, अंजली निर्मळे, सुहासिनी मोदी, धनश्री भानप, सुनीता कात्रेला यांची उपस्थिती होती.
यावेळी सारांश या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये रोहिणी धाट, अंजली निर्मळे, मीना डागा, गीता परदेशी, सुरेखा कचरे, संगीता नावंदर, पद्मजा लोमटे यांना बक्षिसे मिळाली. वैष्णवी भानप हिने उत्कृष्ट रांगोळी रेखाटली होती. नंदन नावंदरने स्वागतनृत्य सादर केले. मेघना मोहिते यांनी प्रार्थना सादर केली. प्रारंभी, अंजली चरखा यांनी प्रास्ताविक केले. मेघना मोहिते यांनी अहवाल वाचन केले. पाहुण्यांचा परिचय सुनीता कात्रेला यांनी करून दिला. सूत्रसंचालन कोमल कात्रेला यांनी केले. धनश्री भानप यांनी आभार मानले.