आष्टी तालुक्यातील फळबागा मोजताहेत अंतिम घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:41 AM2019-03-21T00:41:56+5:302019-03-21T00:42:22+5:30

तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे.

The final element counting the orchards in Ashti taluka | आष्टी तालुक्यातील फळबागा मोजताहेत अंतिम घटका

आष्टी तालुक्यातील फळबागा मोजताहेत अंतिम घटका

Next
ठळक मुद्दे१८ हजार हेक्टरी अनुदान ते पण दोन टप्प्यांत : पाणी विकत घेऊन फळबागा जगविण्याची वेळ

अविनाश कदम।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे.
आष्टी तालुका कायम दुष्काळी म्हणून समजला जातो. गतवर्षी पर्जन्यमान अतिशय कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जलाशय कोरडे पडले आहेत. तर रबीचे पीक पूर्णपणे हातून गेले आहे. कडधान्य नगदी पिकांना महागाईच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी फळबागाकडे वळले आहेत. सध्या तालुक्यात एकूण ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आंबा ३२१ हे., लिंबू २ हजार १९१ हे. , सीताफळ ३३७ हे., चिकू२१९ हे.,डाळिंब १ हजार ८७१ हे.,पेरू १०९ हे.,बोर १४.३५ हे.,आवळा ३६.२५हे., चिंच १३० हे., संत्रा ४१० हे., द्राक्ष १५ हे.,मोसंबी १.५० हे. इ .सर्व मिळून ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. १० हजार ४९६ शेतकरी लाभार्थी असून, फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी उपलब्ध असणारे पाणी दिले. परंतु मार्च महिन्यात पाणीपातळी खोल गेल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत तर शेतकरी हजारो रु पयाचे पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहे, ते पण हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा डोळ्यासमोर जळत आहेत. तर फळबागा जगवण्यासाठी शासनाने काही तरी उपाययोजना कराव्यात, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. नेहमी प्रमाणेच हेक्टरी १८ हजार रु पये तुटपुंजे अनुदान शेतकऱ्यांना देऊन पुन्हा एकदा निराशा केली आहे. ते अनुदान पण ९ हजार रुपये प्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे. या भयंकर दुष्काळात शासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा फळबाग शेतकरी करत आहेत.
कृषी विभागाकडून ठिंबक सिंचन साहित्य खरेदी करण्यासाठी ४५ ते ५० टक्के अनुदान देण्यात येत असून, महागाईच्या तुलनेत ते अतिशय कमी आहे. त्यामध्ये वाढ करु न ८० टक्के करण्यात यावे.
शासनाने शेतकºयांना दुष्काळात फळबाग जगवण्यासाठी हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान जाहीर केले असून ते पण दोन टप्प्यात देण्याचे ठरवले आहे. १० हजार लिटर पाणी विकत घ्यायला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात.
शासनाने दिलेले अनुदान अतिशय तुटपुंजे असून, शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासन करत आहे, असे कºहेवडगावचे शेतकरी अंबादास बांगर म्हणाले.

Web Title: The final element counting the orchards in Ashti taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.